Recent in Technology

Advertisement

Breaking News

अमृता खानविलकरच्या हस्ते प्लॅनेट मराठी ओटीटीचे अनावरण

मुंबई : मागील अनेक महिन्यांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहात होते, ते पहिलंवहिलं मराठी प्लॅनेट मराठी ओटीटी आपल्या भेटीला आले आहे. आपल्या या हक्काच्या ओटीटीवर जगभरात कुठेही बसून मराठी चित्रपट, वेबसीरिज, विविध कार्यक्रम, सोहळे पाहता येणार आहेत. सिनेसृष्टीवर आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू करणार्‍या अमृता खानविलकर हिच्या हस्ते प्लॅनेट मराठी ओटीटीचे अधिकृत अनावरण करण्यात आले. सध्या जरी प्रेक्षकांसाठी प्लॅनेट मराठी ओटीटी अंतर्गत प्लॅनेट मराठी सिनेमावर जून हा एक्सक्लुझिव्ह चित्रपट उपलब्ध असला तरी प्लॅनेट मराठी ओरिजनलही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्लॅनेट मराठी ओटीटीच्या लाँचबद्दल अमृता खानविलकर म्हणते, एवढय़ा मोठया मराठी ओटीटी प्लँटफॉर्मचे अनावरण माझ्या हस्ते झाले, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला विशेष आनंद आहे की, या प्लॅनेट मराठी ओटीटी परिवाराशी मी प्लॅनेट टॅलेंटच्या माध्यमातून जोडले गेले आहे. आतापयर्ंत प्लॅनेट मराठी ओटीटीने आपल्या अनेक आगामी वेबसिरीज, वेबफिल्म्सची घोषणा केली आहे. त्यांचा कंटेन्ट पाहता प्लॅनेट मराठी ओटीटी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख अक्षय बदार्पूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले-अनेक महिन्यांपासून प्रेक्षक प्लॅनेट मराठी ओटीटीची वाट पाहत होते. आम्हाला अत्यंत आनंद होतोय की, आज अखेर प्लॅनेट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आले. तसेच लवकरच प्रेक्षक आपला आवडता कंटेन्ट प्लॅनेट मराठीवर पाहू शकतील. प्रेक्षकांना दर्जेदार, आशयपूर्ण कंटेन्ट पाहायला मिळेल, याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. या व्यतिरिक्त मराठी भाषेला लाभलेला समृद्ध साहित्य वारसा प्रेक्षकांपयर्ंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आणि प्रेक्षकांशी असलेली बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने आमचा कायमच प्रयत्न असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code