Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

माणुसकी मात्र उरलीच नाही..!

फ्लॅट आले घरे गेली
नाती मात्र फाटत गेली,
प्रेम, जिव्हाळा,माया, ममता
सारी सारी लुप्त झाली.

चार-चार बेडरूम्सची घरे झाली!
आजीआजोबांची नातवंडं
पाळणाघरातली children झाली
सोडायला बाई, आणायला बाई
घरच्या मायेला पारखी झाली..

प्रत्येकाची वेगळी खोली !
प्रत्येकाला 'space' झाली !
सारी 'extremely busy' झाली
रक्ताचीही नाती आता
WhatsApp मध्ये बंद झाली..!

घरातल्याच माणसांमधल्या
संवादांची होळी झाली..
हॉटेलिंगची फॅशन आली 
घरची जेवणे बंद झाली..

Modular च्या kitchen मध्ये
मुरंबा,लोणची बंद झाली

खोल्यांची संख्या वाढत गेली
माणसे मात्र कुढत गेली..
चिमुकल्यांची मनेच तुटली..

पैशामुळे नीती गेली..
नीतीमुळे मती गेली..
अहो पैशासाठी माणसाने
माणुसकीही सोडून दिली

फेसबुक, गुगल, सगळे असून
डिप्रेशन ची पाळी आली
प्रत्येकाला शुगर, बीपी .. 
हार्ट चीही गोळी आली ! 

इंटरनेट ने क्रांती केली ! 
मोबाईल ने जादू केली ! 
स्वत:च्याच कोषामध्ये
माणसं आता मग्न झाली.. 

माणसं जाऊन यंत्रे आली !
यंत्रांची मग तंत्रे आली ! 
यंत्रे-तंत्रे सांभाळताना
माणुसकीची फरफट झाली..

सुखं सांगायला जवळच कोणी नाही..
दु:ख ऐकायला आपलं कोणी नाही..
'Sharing' च्या या जमान्यात
माणुसकी मात्र उरलीच नाही.

एकमेकांकडे जात जा
विचारपूस करत रहा
कसला मान आणि अपमान
नाती आपली जपत जा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code