Recent in Technology

Advertisement

Breaking News

लसीकरण आपली सामूहिक जबाबदारी

नवी दिल्ली:कोविड-१९ लसीकरणाच्या महत्त्वाबाबत लोकांना शिक्षित करण्याची गरज असून लसीकरण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. या वर्षाच्या शेवटापयर्ंत सर्व घटकांनी मिळून संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉक्टर दिवसानिमित्ताने चेन्नई इथे प्रख्यात मुत्रपिंडतज्ज्ञ डॉ. जॉर्जी अब्राहम यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी उपराष्ट्रपती बोलत होते. माय पेशन्ट माय गॉड- जर्नी ऑफ ए किडनी डॉक्टर हे पुस्तक डॉक्टर अब्राहम यांच्या चार दशकांच्या डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ तसेच संशोधक म्हणून केलेल्या प्रवासाचा लेखाजोखा आहे. काही घटकातील विशेषत: ग्रामीण भागातील लोकांची लस घेण्यासंदर्भातील साशंकता दूर करायला हवी, यावर त्यांनी भर दिला. समाजातल्या काही घटकांमधील भीती दूर करायला हवी आणि लसीकरण हे खर.्या अथार्ने देशव्यापी जनआंदोलन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्राने याकामी पुढाकार घेत लोकांना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे, त्यांना शिक्षित करत जनजागृती करावी असे आवाहनही उपराष्ट्रपतींनी केले. कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्यात समाजाचा पाठिंबा अतिशय महत्वाचा आहे. लस घेण्याबाबत टाळाटाळ करणारे स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या जीवालाही धोक्यात टाकत आहेत, हे त्यांना पटवून द्यायला हवे. हा धोका लसीकरणाने टाळता येणारा आहे असे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code