Header Ads Widget

मुरबाड, देवगाव मध्ये ''आई'' विषयावर रंगले कवी संमेलन ; स्मृती दिनानिमित्ताने अनोखा उपक्रम

मुरबाड / ठाणे प्रतिनिधी : मुरबाड तालुक्यातील देवगांव येथे रहाणाऱ्या  जनाबाई मंगल अहिरे  यांच्या  प्रथम स्मृती दिनानिमित्ताने  मुरबाड तालुक्यातील  देवगांव  येथे    "आई"  या विषयावर  कवी संमेलन घेऊन एक आगळा वेगळा उपक्रम  पार पडला. यावेळी ''आई'' या विषयावर  कविता सादर  करून आई बद्दल असलेले प्रेम,आदर, भावना कवींनी आपल्या  कवितेतून व्यक्त  करून  काव्य फुलांनी  अभिवादन केले.
  या कवी संमेलनासाठी  कवी  वसंत हिरे ( मुलुंड), नवनाथ रणखांबे ( कल्याण) , जगदेव भटु (भिवंडी),  शाम भालेराव ( कल्याण) कवयित्री
मनीषा मेश्राम (कल्याण)  कामिनी धनगर (दहिगाव)  प्रज्ञा अहिरे (देवगांव)  उपस्थित होते. विविध कवितेतून आईच्या बहारदार कविते बरोबर प्रबोधनात्मक कविता  उपस्थितांना ऐकण्यास मिळाल्या.  कवींना यावेळी सन्मानचिन्ह आणि पुष्प देऊन मंगल अहिरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार  मंगल अहिरे  यांनी केले तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत हिरे यांनी केले . यावेळी  अहिरे परिवातील सदस्य  गोरखक्षनाथ अहिरे ,सोनम अहिरे, नरेश अहिरे,गुलाब साबळे,नयना रोकडे, कामिनी धनगर,प्रज्ञा अहिरे,बळीराम अहिरे, सुप्रिया अहिरे, अनिता अहिरे, मनोज अहिरे,  इत्यादी  अहिरे तर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या