Recent in Technology

Advertisement

Breaking News

लगीन घाई

  प्रिये वाटते आज रातीला
  तुझ्या संगें लगीन करावे
  लग्नास सखे सोबती
  असतील चंद्रमा वरहाडी
  असतील लुकलुकणारे
  तारे आणि साक्षीस
  असेल निळेभोर आकाश
  आणि चमकणारे काजवे
  मध्येच पावसाची एक
  सर यावी व अक्षदा
  म्हणून दोघांवर कोसळावी
  आणि मध्येच एक तारा
  तुटावा आणि आपल्या
  मीलनाचा बहाना होवोवा
  व रातसंध्याचा कुशीत
  विसावा व नव्या स्वप्नांची
  पहाट व्हावी गवतावर
  जसे दवबिंदू पडावे
  प्रा. संदिप रामदास मोकळे
  कांचनवाडी, औरंगाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code