पिंपळखुटा येथील श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकांतर्गत वृक्षरोपण, संवर्धन आणि जनजागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे.महाविद्यालय परिसरात आणि अंजनसिंगी ते चिंचपूर मार्गावर प्रातिनिधिक स्वरूपात वृक्ष लागवड करून या अभियानास सुरवात करण्यात आली आहे.
पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष लागवडीची गरज विशद करित या उपक्रमामध्ये प्रत्येक विदयार्थाने,प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गावकऱ्यांनी उस्पृतपणे सहभागी होवून वसुंधरेला वाचविण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन उपस्थित मान्यवर यांनी याप्रसंगी मत व्यक्त केलेत.वृक्षारोपण कार्यक्रमात प्राचार्य डॉ सुभाष मुरे रोसेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश इंगळे,तसेच प्रा.डॉ.मेघा सावरकर,श्री संतोष नागपुरे,श्री अमित मेश्राम,अंकुश हुके,सागर डाहे यांचे सह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी स्वयंसेवक आणि विदयार्थी सहभागी झाले होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या