Header Ads Widget

डेंग्यूने घेतला महिला डॉक्टरचा बळी

तिवसा:तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक, व आयुर्वेदिक रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. माधुरी भोयर यांचे डेंग्यू या आजाराने निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. माधुरी आयुर्वेद रुग्णालयातील प्रसूती विभाग व स्त्री रोग तज्ञ म्हणून आरोग्य सेवा देत होत्या. दरम्यान त्यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यू या आजाराची लागण झाली होती. अशातच खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची बुधवारी रात्री प्राणज्योत मालवली.त्यांच्या या अकाली जाण्याने रूग्ण सेवेत न संपणारी पोकळी निर्माण झाली असून ही दु:खद बातमी कळताच आयुर्वेद महाविद्यालय कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थ्यांनी डॉ च्या निवसाकडे धाव घेऊन एकच हंबरडा फोडला त्याच्या मृत्यू मूळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या पश्‍चात पती दोन मूले आई वडील, असा बराच मोठा आप्त परीवार आहे. त्यांच्या अचानक अकाली जाण्याने आरोग्य विभागाची मोठी हानी झाल्याचे मत गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयाच्या अनेक चिकित्सकानी व्यक्त केले आहे. गुरुदेवनगर येथील श्रीगुरुदेव मोक्ष धाम येथे त्यांच्या पार्थीवावर अंतिम संस्कार करण्यात आले असून जिल्ह्यातील आरोग्य चिकित्सकानी उपस्थीत राहून र्शद्धांजली अर्पण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या