Recent in Technology

Advertisement

Breaking News

आता हॉस्पिटलमध्ये किंवा लॅबमध्ये जाण्याची गरज नाही ; घरच्या घरी करा कोरोना टेस्ट

    नवी दिल्ली :कोरोनाची चाचणी करण्यासाठी आता हॉस्पिटलमध्ये किंवा लॅबमध्ये जाण्याची गरज नसून घरच्या घरी ही टेस्ट करणे भारतीयांना शक्य होणार आहे. यासाठी आवश्यक असणार्‍या तीन किट्सना इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मान्यता दिली आहे. किट्स बाजारात उपलब्ध होत असून त्याचा उपयोग करून आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे प्रत्येकाला समजू शकणार आहे.

    कोविसेल्फ (पॅथोकॅच) कोविड १९ ओटीसी एंटीजन एलएफ डिव्हाइस, पॅन बायो कोविड १९ एँटिजन रॅपिड टेस्ट डिव्हाइस आणि कोविफाइन्ड कोविड १९ रॅपिड एज सेल्फ टेस्ट अशी या ३ किट्सची नावे आहेत. ही किट्स सध्या देशाच्या विविध भागात उपलब्ध असून त्याचा उपयोग करून घरबसल्या कोरोनाची टेस्ट करणे शक्य होणार आहे.

    या किटचा उपयोग करून कोरोनाची टेस्ट करता येते. या टेस्टमध्ये येणारे तपशील समजतात. या टेस्टमध्ये दिसणारे निकष आयसीएमआरच्या अँपवर अपलोड करावे लागतात. त्यानंतर काही मिनिटांमध्ये टेस्टचा रिपोर्ट समजतो. मात्र आयसीएमआरला डिटेल्स सबमिट केल्याशिवाय टेस्टचा निकाल समजू शकत नाही. अनेक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असतानादेखील ही बाब लपवून ठेवण्याची शक्यता असते. हे प्रकार टाळण्यासाठी आयसीएमआरकडे त्याचे तपशील पाठवण्याची तरतूद या किट्समध्ये करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे दिसायला लागलेला रुग्ण हा अनेकदा अशक्त झालेला असतो. त्यामुळे कोरोनाची टेस्ट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणे किंवा लॅबमध्ये जाणे त्रासाचे होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code