मुंबई : राज्य सध्या भूस्खलन, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींशी झगडत आहे. काहींनी यात जीव गमावला, तर काहींनी जीवापाड प्रेम असलेली माणसं. राज्यात दु:खाचे, काळजीचे वातावरण असले तरी त्यात आता एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता एक कोटींहूनही अधिक झाली आहे. अशा प्रकारचा विक्रम करणारे महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या