Header Ads Widget

डिझाईन क्षेत्रातल्या संधी

इंटरिअरवर प्रचंड खर्च केला जात असला तरी घराला आकार देण्यामागे इंटरिअर डिझायनरची मेहनत आणि आणि कल्पकता असते. मुळात इंटरिअर डेकोरेशन आणि इंटरिअर डिझायनिंग या दोन संज्ञांमध्ये खूप फरक आहे. इंटरिअर डिझायनिंगचं क्षेत्र पूर्णपणे वेगळं असून याचा संबंध डिझायनिंगशी आहे. डिझायनिंगचं क्षेत्र अर्मयाद आणि व्यापक आहे. वेळोवेळी घराची दुरुस्ती आणि नूतनीकरण केलं जातं. यासाठी इंटिरिअर डिझायनर्सची गरज भासते. फक्त घराच्याच नाही तर दुकानं, दालनं, मॉल्स, कार्यालयांच्या डिझायनिंगसाठी डिझायनर्सची आवश्यकता असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत डिझायनिंगच्या क्षेत्रात येण्यासाठी चित्रकला चांगली असणं महत्त्वाचं मानलं जात होतं. मात्र आज डिझायनिंगशी संबंधित अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध असल्यामुळे चित्रकलेमध्ये गती नसली तरी या क्षेत्रात कारकीर्द घडवणं शक्य झालं आहे. इंटरिअर डिझायनिंगच्या क्षेत्राची निवड करण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली नाही. ठराविक विषय घेतल्यास किंवा काही विषयांवरील गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो, असंही नाही. सर्वसाधारणपणे हस्तकला, चित्रकला यांसारख्या कलांमध्ये गती असणारी, कल्पक, निरिक्षणशक्ती उत्तम असणारी, व्हज्युअलायझेशनची क्षमता असणारी मुलं डिझायनिंगकडे वळतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे डिझायनिंगच्या क्षेत्रातही विविध सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी निश्‍चितपणे मिळते. डिझायनर्सना भारतातच नाही तर परदेशातही अनेक संधी आहेत. इंटिरिअर डिझायनिंगची बाजारपेठ यापुढच्या काळात विस्तारत जाणार आहे. २0२५ पर्यंत या बाजारपेठेत मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातल्या डिझायनिंग क्षेत्राच्या व्याप्तीबद्दल बोलायचं तर सीआयआयच्या आकडेवारीनुसार भारतात ३६,३८७ डझायनर्स असून त्यापैकी १0.१७ टक्के इंटरिअर डिझायनर्स आहेत. पुढील दशकभरात इंटरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रातल्या नोकर्‍यांमध्ये दहा टक्क्यांची वाढ अपेक्षत आहे. इंटरिअर डिझायनिंगच्या अभ्यासक्रमांची निवड करणार्‍या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या काळात अशा डिझायनर्सच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी डिझायनिंगच्या क्षेत्राकडे वळायला हरकत नाही. दहावी किंवा बारावीनंतर किंवा पदवी मिळवल्यानंतरही डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तम करिअर घडवता येतं. इंडियन इन्स्टिीट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाईन या संस्थेत नोंदणी करून तुम्ही कामाला सुरूवात करू शकता. सध्याच्या काळात कंपन्या इंटिरिअर डिझायनर्सची नियुक्ती करतात. अनेक कंपन्यांना दर तीन वर्षांनी कार्यालयाची रचना बदलावी लागते. याच कारणामुळे इंटिरिअर डिझायनर्सना कंपन्यांमध्ये उत्तम पगाराची नोकरी मिळू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या