क्रांतीज्वालेच्या दिशेनं
निघालेल्या परिवर्तनवादी
समुहांना अन्यायकारी
षडयंत्रकारी यंत्रणेनं
दाबण्याची जी कवायत
केली जात आहे
ती लोकशाहीला घातक आहे.
सायबरच्या बनावट खेळात
लोकशाहीवादी विचारवंताचा
आवाज दाबणे म्हणजे
सत्तामुजोराचे वैफल्य आहे.
आदिवासी,शोषित,गरीब व वंचित
समूहाची लढाई न्यायाने लढने
हे क्रांतीकारी कार्य आहे.
या लढाईतील परिवर्तनवादी लाट थोपवनं
पुनरुज्जीवनवादी तत्वांना शक्य नाही.
परिवर्तनचा सुर्योदय
रात्रीच्या काजव्यांनी
उजाडायचा थांबत नाही.
स्टेन स्वामीची डेथ ही एक इंस्टिट्यूशनल डेथ आहे.
मानवी न्यायाची अहवेलना आहे.
क्रांतीच्या परिवर्तनवादी पांखरानो
मानवमुक्तीचा संग्राम पुन्हा लढायचा आहे.
संविधानात्मक विचारन्यायातूनच
उद्याचा सूर्य उजाडणार आहे.
कारण परिवर्तनवाद हाच
निसर्गाचा एल्गार आहे.
- संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००
0 टिप्पण्या