माय
माय घरात घरात, गाय वासराचं नातं
माय उभ्या संसारात, लख्ख पेटणारी वात..!!
माय शेतीत मातीत, गहू जवारी न् भात
माय भुकेत भूकेत, तान्ह्या लेकराचा दात..!!
माय काजव्याची रात, कशी दिसे अंधारात
माय कंदीलाची वात, जळे पायलीच्या आत..!!
माय ईश्वर अल्लाहत, माय गौतम बुद्धात
माय जातीत धर्मात, माय समतेचा हात..!!
माय ग्रंथात ग्रंथात, नाही मावे पुस्तकात
माय विश्वात विश्वात, विश्व मावे ना तिच्यात..!!
प्रा. महेश वसंत कोंबे पाटील
रा. आष्टा रामपूर जि. यवतमाळ
0 टिप्पण्या