- तिवसा / डॉ. नरेश इंगळे
गुरुमाऊली फिल्म प्रोडक्शन अकोला द्वारा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन नृत्य स्पर्धेत अमरावतीची मधुरा विनोद गावंडे ही अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. ती अमरावती येथील ज्ञानमाता हायस्कूलची इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी असून तिने अत्यन्त प्रतिकुल परिस्थिती आणि अथक परिश्रम करून हे यश मिळवले आहे. याच स्पर्धेत पवन उंबरकर अकोला, निधी शिरोडकर सिंधुदुर्ग,स्नेहल ठाकरे पुणे अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेत.
स्पर्धेत सहभाग आणि यशासाठी मधुरा ने कठोर मेहनत घेतली. प्रात्यक्षिक करताना महाबळेश्वरच्या 10 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये मधुरा ओली चिंब होऊन डान्स करत होती आणि गाडीमध्ये हिटर लावून व्हिडीओ शूट होत होता. जवळपास तिने तीन रिटेक घेतले. अक्षरशा थंड वातावरण आणि सुरु असलेल्या पावसामुळे ती थंडीने कुडकुडत होती. निवडलेले ठिकाण हे खोल दरीच्या बाजूला होते त्याची भीती मधुराच्या मनात होती. अशा कठीण प्रसंगात तिने आपला व्हिडिओ शूट करण्याची जिद्द सोडली नाही. प्रॉडक्शन नी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ हा त्याच दिवशी देणे भाग असल्यामुळे मधुराने त्याच वातावरणात व्हिडिओ शूट करण्याचा निर्णय घेतला. तिला लाईक्स मिळाव्या म्हणून घरातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रपरिवार यातील प्रत्येक व्यक्ती गेल्या तीन दिवसापासून झटत होता. मधुराला मिळालेल्या लाईक्स केवळ अमरावती पुरत्या मर्यादित नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील लाईक्स सुद्धा तिला मिळालेल्या आहेत. प्रत्येकाला व्हिडिओ शेअर केला त्यातूनच उत्तम असा प्रतिसाद तिला मिळाला अनेक दर्शकांनी तिला उत्स्फूर्त अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.कोणताही प्रोफेशनल क्लास लावलेला नसताना तिने दिलेला परफॉर्मन्स हा लोकांना खूप भावला त्यातूनच तिला हा प्रतिसाद मिळाला आहे. ती लवकरच एका आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
मधुराने आपल्या यशाचे श्रेय आई वडीलासह गुरुवार्याना तसेच गुरू माऊली फिल्म प्रॉडक्शन संस्थापक श्री संतोष कुमार खवले यांना दिले आहे. मधुरा ही विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष तथा शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विनोद गावंडे यांची कन्या असून तिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या