
नवी दिल्ली:पब्लिक प्रोविडेंट फंड (पीपीएफ) तसेच राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) सारख्या सवार्सामान्यांना आवडणार्या छोट्या बचतीवरील व्याजदर सरकारने पूर्वी प्रमाणेच ठेवले आहे. आर्थिक वर्ष २0२१-२२ च्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत नागरिकांना एप्रिल-जून या तिमाही प्रमाणेच व्याज मिळेल.
सरकारच्या निर्णयामुळे जुलै-सप्टेंबर या तिमाहीत सर्वसामान्यांना ५ वर्षांसाठीच्या फिक्स डिपॉझिटवर ६.७ टक्के, १२ महिन्याच्या डिपॉझिटवर ५.५ टक्के, एनएससी वर ६.८ टक्के, पीपीएफ वर ७.१ टक्के, सुकन्या समृद्धी खात्यावर ७.६ टक्के तसेच वरिष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेवर ७.४ टक्के व्याज मिळेल. यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचाही समावेश आहे.
एप्रिल महिन्यात देशातील ५ विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या. यावेळी अर्थ मंत्रालयाने ३0 मार्च २0२१ रोजी लहान बचत योजनांच्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला होता. पंरतु, १२ तासांहून कमी वेळेत हा निर्णय मागे घेण्यात आला.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी सकाळी ट्विट करीत लहान बचत योजनेच्या व्याज दरात कुठल्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाही. अगोदर काढण्यात आलेले आदेश चुकीने जारी करण्यात आले होते, असे स्पष्टीकरण त्यावेळी दिले होते.किसान विकास पत्र अल्प बचत योजना आहे. या योजनेला भारतीय पोस्टने १९८८ मध्ये सुरू केले होते. दीर्घ काळासाठी लोकांनी यात गुंतवणूक करावी असा या योजनेचा उद्देश होता. या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये गुंतवावे लागतात. या योजनेसाठी अधिकाधिक मयार्दा नाही. सरकारने २0१४ मध्ये या योजनेअंतर्गत पॅनकार्ड अनिवार्य केले होते. मात्र ५0 हजार रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्यास पॅनकार्ड अनिवार्य आहे. सध्या या योजनेत पैसे गुंतवल्यास तुमचे पैसे १२४ महिन्यात म्हणजेच १0 वर्ष ४ महिन्यात दुप्पट होतात. यावर सध्या ६.९ टक्के व्याज मिळते, तर आयकरामध्ये सूट मिळते.
0 टिप्पण्या