Header Ads Widget

समाजभुषन प्रा. रमेश वरघट सरांनी वृक्षारोपन करून साजरी केली आगळीवेगळी एकसष्टी

(गौरव धवणे) 
          करजगांव : वाढदिवस म्हटले की नविन कपडे, सजवलेला केक, मेणबत्त्या, फुगे, गोड-धोड पदार्थ, भेटवस्तू , ओली सुकी पार्टी, मित्रमंडळी,नातेवाईक, हाॅटेल बुक करणे, आरोग्य, सुख, शांती, दीर्घायुष्याच्या कामना हे सारंच पर्यायांनं आलंच.
          पण राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, समाजभूषण  प्रा. रमेश वरघट सरांनी वयाच्या साठ वर्षापर्यंत कधी आपला वाढदिवस साजराच केला नाही. आणि गतवर्षी त्यांच्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छांचा एक सुंदर व्हिडिओ त्यांना पाठविला. त्या दिवशी त्यांनी अगदी साधे पणाने आपला वाढदिवस पैनगंगा अभयारण्यात घालविला. यावेळी कापेश्वर, उनकेश्वर, माहूर, सहस्त्रकुंड धबधबा या ठिकाणांना सुद्धा भेटी दिल्या होत्या.
           
या वर्षी त्यांची एकसष्टी होती आणि एकसष्टीचं वाढदिवसात खास महत्त्व असतं. एकसष्टी सुद्धा त्यांनी अगदी साध्या पद्धतीने साजरी केली .यातही वाढदिवसात असणारं काहिच नव्हतं. यावेळी आपल्या घरगुती रोपवाटिकेतील 11 रोपे घेऊन ते सपत्नीक निवडक लोकांसोबत निसर्गाच्या सानिध्यात गेले. तेथे त्यांनी जंगलात वनभोजनाचा आनंद घेतला. तेथे थोडावेळ घालविल्या नंतर घरून नेलेल्या वड, पिंपळ, करंज, सीताफळ आणि कडूनिंब या वृक्ष प्रजातीचा च्या अकरा रोपट्यांचे नाल्याच्या काठाकाठाने वृक्षारोपण केले. 
       
यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. आशा वरघट, अवधूतराव बरडे, सौ. कल्पना बरडे, संजय बरडे, दीक्षांत बरडे, विषाखा बरडे, अंकिता जाधव, आदित्य वानखडे आदि. शेजारची मंडळी व बालगोपाल होते या सर्वांनी वृक्षारोपण कार्यक्रमाला सहकार्य केले.
 
सरांच्या एकसष्टीप्रसंगी आठवणीतील करजगांव समुहाचे सदस्य, सहकारी, मित्रपरिवार, हितचिंतक, आप्तेष्ट इत्यादिंनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भेटून तर काहींनी समाजमाध्यमातून प्रा. रमेश वरघट सरांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या