Header Ads Widget

राज्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर

    सांगली : राज्यातील नऊ जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले. चिपळूण, महाड आदी ठिकाणी अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले होते. सांगली आणि कोल्हापुरात अद्यापही घरांमध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील सर्व साहित्य, दुकानातील सामान पूर्णत: वाया गेले आहे. अशावेळी राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरले त्यांना १0 हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी पाच हजार रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने केली.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र अधिकारी नेमला आहे. महाड आणि चिपळूणमध्ये ३0 फुटापयर्ंत पाणी होते. दरडी कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढली आहे. लोकांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. सांगलीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाणार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या