Header Ads Widget

बा विठ्ठला

नाही आलो भेटिलागि
नको रुसु बा विठ्ठला
तुझ्या नावाचा गजर
माझे हृदयी मांडला !

आज सण एकादशी
मि उपवास ठेविला
अहंकार माया मोह
तुज प्रसाद वाहिला !

काम,क्रोध,द्वेष,लोभ
तुझ्या चरणी वाहिले
चरणी तुझिया आज
मि परब्रह्म पाहिले !

अगा पंढरीच्या राणा
माझे विठ्ठल सखया
कृपाळू तू दयाघना
तुची दाखवी रे दया !

संपू दे रे ईडा पीडा
काळ येऊ दे सुखाचा
तुच जगाची माऊली
नाश करावा दुःखाचा !

विनवितो वासुदेव
जोडुनिया दोन्ही कर
तुझे नाव मुखी, कानी
हरिनामाचा गजर !

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
 अकोला 9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या