असा ढगांमधे दडु
धरणी झाली कासाविस
तीला कोसळले रडू !
नको नको रे पावसा
असा मारू नको दड़ी
सुकले रे नदी नाले
भरून वाहू देरे दुथड़ी !
नको नको रे पावसा
नको देऊ भूलथापा
झूले ओसाड रानात
बिना सुगरणीचा खोपा !
नको नको रे पावसा
तू नको रुसु असा
तुझविना रे तड़फड़े
जीवा जीवातला रे मासा !
नको नको रे पावसा
नको असा रे छळू
धरा आभाळाच नात
नको असा तू तोडू !
नको नको रे पावसा
असा धरु नको राग
बरस दाहि दिशांतुन
शांत होऊ देरे आग !
येरे येरे पावसा
काळ्या काळ्या मेघातुन
पीकू देरे हिरे मोती
काळ्या आईच्या पोटातून !
- वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
अकोला 992348556
0 टिप्पण्या