Header Ads Widget

पावसा...

कुठे मारली तू दडी पावसा...
प्रतीक्षा तुझी हरघडी पावसा...

मनाला असे खंत याची अता,
निघाला तुही बेगडी पावसा...

सुखाची कधी ओल ना भेटली,
उभी जिंदगी कोरडी पावसा...
 
पिके करपली पाहुनी बरसते,
जणू आसवांची झडी पावसा...

धुवाधार नक्कीच येशील तू,
उरी आस ही भाबडी पावसा...

- संदीप वाकोडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या