Header Ads Widget

४0 हजार रुपयांची लाच घेताना पुरवठा निरीक्षकासह तांत्रिक सहायकला अटक

अमरावती : एका शासकीय महिला कर्मचार्‍याला त्यांच्या विरूध्द सुरू असलेल्या चौकशीमध्ये कुठलीही कारवाई न होवू देण्याकरीता ५0 हजार रुपयाची लाच मागणार्‍या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन व तांत्रिक सहायकाला प्रत्यक्ष ४0 हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचतप प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले असुन दोन्ही आरोपि विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दार महिला शासकीय कर्मचारी असुन त्यांच्या विरूध्द २९ जुन रोजी एका शासकीय रास्त दुकानदार यांनी तक्रार केली होती. याच तक्ररीची चौकशी सुरू असुन या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होवु नये यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे कार्यरत असलेले अव्वल कारकुन, पुरवठा निरिक्षक नारायण चव्हाण, वय २९ तसेच अविनाश भगत, वय २९ तांत्रिक सहायक, यांनी ५0हजार रुपयाची लाच मागितली होती. सदर महिलेने या सदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता ३0 जुन रोजी प्रत्यक्ष आरोपी चव्हाण व भगत यांना ४0 हजार रुपयाची लाच घेतांना अधिकार्‍यांनी रंगेहाथ अटक केली. दोन्ही आरोपि विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या