• Sun. Jun 4th, 2023

हाताला काम द्या ; पोटाला अन्न द्या..!

“धैर्य समस्त शक्तियों और आनंद का मूल है।धैर्यवान व्यक्ती कभी भी नाकामयाबी से निराश नही होता।बल्कि हर असफलता उसे और अधिक प्रेरित करती है।अपने लक्ष्य को प्राप्त करने के लिए इतिहास में एेसे कोई उदाहरण नही है ।जब आदमी के धैर्यपूर्ण प्रयत्न कभी असफल हुए हो । उतावलापण और कामयाबी एक दुसरे के प्रतिककुल भाव है।सफलता जल्दबाजी में नही मिलती और जल्दबाजी में मिली सफलता कभी स्थायी नही होती।”
-जान रस्कीन
आज कोरोनाच्या महामारीने सारे क्षेत्र उध्दवस्त झाले आहेत.जे माणसे कामावर होते त्यांना कामावरून कमी केले आहे.छोटे उद्याेगधंदे लयास जात आहे.शिक्षण घेतलेली मुले जीवनाविषयी बैचन आहेत.सरकारी नौकरी बंद आहे.खाजगी कंपण्यात रोजगार नाही . माणसाचे जीवन भयग्रस्त झाले आहे.त्यात शासनाने जे आदेश काढले त्यांनी त्यांचे कंबरडेच मोडून गेले आहे.शिक्षणाच्या वाटा बंदिस्त होऊन गेल्या आहेत.अशा वातावरणात राजकिय खेळी सुरू आहे.
आज बेराेजगाराची दर आकाशाला भिडला असून छुपी बेरोजगारीचा अंदाज सरकारला आला नाही.शिक्षण पूर्ण करून सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलांचे स्वप्न अंधकारमय होत आहे.सरकारच्या घोषणेनं त्यांना थोडी उर्मी येते पण पुन्हा सरकार आपला निर्णय बदलवतो .त्यामुळे तरूणाईचा स्वप्नभंग होतो.लॉकडाऊनच्या फतव्याने सारी तरूणाई हतबल झाली होती . कोरोना विषाणूच्या महामारीने सारे कामक्षेत्र बंद आहेत.हाताला काम नाही .मेंदूला खुराक नाही.पोटाला अन्न नाही अशा भयावह गर्केत तो स्वतःच आयुष्य जगत आहे की ही परिस्थिती बदलेलं आमच्या शिक्षणाचा समाजाला व देशाला फायदा होईल पण ते दिवस उगवत नाही.सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण केल्याने तो अस्वस्थ आहे.गरीबीची दशा व कामाची सजा अशा चक्रव्युहात तो आज सापडला आहे.स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दुःखात आहेत.एमपीएसी व युपीएसी ह्या परिक्षा विद्यार्थांसाठी लॉलिपॉप ठरत आहेत.वर्तमान केंद्र सरकारने युपीएसी परिक्षा पास न होता लँटरलएंट्री ने आयएएस दर्जाचे लोक सेवेत घेतले आहेत.हे कृत्य असैंवधानिक असतांना आमचा तरूण आंदोलन न करता सरकारच्या निर्णयाचे समर्थन करतो.पक्षाचे काम करतो .वॉट्सप विद्यापीठात मशगुल राहतो.हे काम तरूणाईसाठी अत्यंत धोकादायक आहे.आता तरी आपण आपले धार्मिक मेंदू स्वच्छ केले पाहिजे.संविधानात्मक जबाबदारी ओळखून संघर्षाला समोर जायला हवे.
नुकतीच स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा पुण्यात फुरसुंगी येथे राहणारा स्वप्निल लोणकर या विद्यार्थांने आत्महत्या केली .त्यांनी आपल्या सुसाइड नोटमधून सरकारच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहेत.घरची परिस्थिती बेताची .आईवडिल गरीब . कर्जाचा डोंगर वाढतो आहे.नोकरीची गँरंटी नाही.यामुळे काही मुले वैफल्यग्रस्त होतात.त्यांना योग्य मार्ग सापडत नाही यातून ते टोकाची भूमिका घेतात व स्वतःला संपवतात.ही गोष्ट नक्कीच वेदनादायक आहे.तरूण हा जीवनाला नवा आयाम देणारा शिल्पकार असतो.त्यांनी अशी भूमिका न घेता जीवन संघर्षास तयार राहावे.एमपीएसी परिक्षा पास झालेल्या विद्यार्थांच्या नियुक्ती करण्यात आली नाही.यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सामुदायीक आत्महत्येची परवानगी मागितली आहे.कारण ही मुले कामगार ,गरीब,शेतकरी,यांचे आहेत.पोटाला चिमटा देऊन मजल मारतात पण शासन त्यांना नियुक्ती देऊ शकत नाही ही राज्यकारभाराची यंत्रणा कशी सुरू आहे यांचे जळजळीत वास्तव व्यक्त करते.
आज हा तरूण खदखदत आहेत.त्याच्या हाताला काम व पोटाला अन्न देणे शासनाचे कर्तव्य आहे.कारण या सर्व घटनासाठी सरकार जबाबदार आहे.मागच्या सरकारने महापरिक्षा पोर्टल आणले होते त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला .शेवटी ही व्यवस्था बदलवण्यात आली.पण नवीन यंत्रणा तयार होऊनही सरकार योग्य भर्ती करत नाही.योग्य परिक्षा घेत नाही.शिक्षक भर्ती ही एक रखडलेली प्रक्रिया आहे.विविध कार्यालयात पदभर्ती होत नसल्याने कामाचा ताण इतर कर्मचाऱ्यावर पडत आहे.सरकारचे कामे वेळेवर होत नाही.शेतकरी ,कामगार ,गरीब,वंचित ,शोषित , मागासवर्गीय,आदिवासी हे घटक मोठ्याप्रमाणात पिचल्या जात आहेत.शासनाने आतातरी योग्य नियोजन करुन तरूणाईच्या हाताला काम द्यायला हवे.त्यांच्या बांध जर फुटला तर परिस्थितीत हाताबाहेर जाऊ शकते.यासाठी प्रत्येक विभागातील सरकारी नौकरी भर्ती लवकरात लवकर सुरू करावी.मुलात नैराश्य निर्माण होऊ न देता त्यांना बळ द्यावे.केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी ताबडतोब मोठा निर्णय घेऊन नव्या आशा व लता प्रफुल्लीत कराव्या .देशाच्या तरूणाईला मनोरूग्ण होण्यापासून वाचवावे.त्याच्या हाताला काम द्या।पोटाला अन्न द्या।।पहा तो देश विकासात आपले सर्वस्व लावून नवा समाज निर्माण करू शकताे . तूर्तास थांबतो..!
संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *