मुंबई : छोट्या पडद्यावरील अग्गबाई सूनबाई या मालिकेत सध्या अनेक घटना घडताना पाहायला मिळत आहेत. इतके दिवस आसावरीपासून लपून राहिलेलं सुझेन आणि सोहमचं प्रेमप्रकरण उघड झाले आहे. त्यामुळे आसावरीने सोहमला घरातून आणि कंपनीमधून बाहेर काढले आहे. मात्र, तरीदेखील सोहमला त्याची चूक उमगली नसून आता तो आईविरोधातच सूड भावनेने पेटून उठला आहे. विशेष म्हणजे यावेळी आजोबांच्या मदतीने त्याने आसावरी राजेंना धडा शकवण्याचा निर्धार केला आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी सुझेन आणि सोहम यांच्यातील नातं आसावरीसमोर उघड होते. त्यामुळे त्याच दिवशी आसावरी सोहमला घराबाहेर हकलून देते. केवळ इतकंच नाही तर त्याच्यासाठी कंपनीचे दरवाजेदेखील बंद करते. त्यामुळे आता राहण्याची आणि नोकरीची सोय नसल्यामुळे सोहमवर रस्त्यावर रहाण्याची वेळ आली आहे. परिणामी, आता तो पुन्हा घरी येण्यासाठी प्रयत्न करु लागला आहे. मात्र, आसावरीने त्याने घरात पाऊल ठेवायचे नाही असे निक्षून सांगितले आहे. त्यामुळे आता सोहम आजोबांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन घरात शिरण्याचा प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, आजोबा सध्या गावी गेले असून घरी परतल्यानंतर ते सोहमची विचारणा करतात. यावेळी घरातील प्रत्येक जण सोहम कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगतात. मात्र, बबडू घडलेला प्रकार आजोबांच्या कानावर घालतो आणि ते ऐकल्यावर आजोबांना चक्कर येते. इतकंच नाही तर सोहमला परत बोलाव असा हट्टदेखील ते करतात. परंतु, आजोबांच्या हट्टापुढे आसावरी नमेल का? शुभ्राला खरंच न्याय मिळेल का? की आजोबांच्या हट्टापायी आसावरी तिच्या तत्वांना मुरड घालेल. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सोहमसाठी पुन्हा उघडणार घराचे दरवाजे?
Contents hide