मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमी सोशल मीडियावर अँक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चर्चेत राहत असते. तर सध्या सारा केदारनाथ या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक जहान हांडा यांना डेट करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. याआधी ही साराचे नाव दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि कार्तिक आर्यनसोबत जोडले गेले होते.
केदारनाथ या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक जहान हांडा यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहेत. या फोटोत जहान हांडा आणि सारा अली खान एका समुद्राच्या बीचवर सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. सारा आणि जहानने या फोंटोत नारंगी रंगाचे एकसारखे दिसणारे कपडे घातले आहेत. याशिवाय या फोटोंला रिटिविट् करत साराने लव यू आणि टेक मी बॅक असे लिहिले आहे.
एकीकडे सारा आणि जहान हांडा याचा हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे फोटोंमध्ये दिसणारी व्यक्ती साराचा मित्र असल्याचे म्हटले जात आहे. जहान हांडा यांनी याआधी अनेक चित्रपटांचे पटकथा लेखक म्हणून काम केले आहे. याशिवाय गेल्या वर्षी जहानने साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक चिठ्ठी लिहिलेली होती. त्यांनी काहीच नाही हे आपले प्रेम, आपली मैत्री ही अनेक काळापासून तयार झालेल्या आठवणींचे प्रमाणपत्र असेल. प्रेम, उत्सव, चांगली वेळ, वाईट वेळ, एक साथीचा रोग आणि बरेच काही.. हॅप्पी बर्थडे कृतज्ञता प्रिय आनंद नेहमी आपल्यासाठी. असे लिहिले होते.
सारा अली खानसोबतचा तो मिस्ट्री मॅन कोण?
Contents hide