• Mon. Sep 18th, 2023

समाजसुधारक फातिमा शेख

  “फातिमा शेख या आधुनिक भारताच्या समाज सुधारक होत्या” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या. त्यांनी सावित्रीबाई बरोबर शिक्षण घेतले होते. त्यांनी पुणे येथे अध्यापकीय शिक्षण घेतले होते.त्यामुळे त्या भारतातील मुस्लीम समाज्याच्या पहिल्या शिक्षिका म्हणून अग्रेसर होत्या. महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडे वाडा येथे मुलीसाठी पहिली शाळा सुरु केली त्या शाळेत फातिमा शेख सावित्रीमाई फुले बरोबर शिकविण्याचे कार्य करीत होत्या त्या शाळेत प्रवेश घेतलेल्या ६ मुली होत्या काही लोकांच्या मते फातिमा शेख या त्या पैकी एक होत्या, असा समज आहे असे नसून महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या बरोबरीने काम करणारी धाडसी महिला होती यासाठी फातिमा शेख यांचा भाऊ उस्मान शेख यांनीही सहकार्य केले आहे. खरे तर इंग्रज सरकारच्या काळात आणि सनातनी जातीयवादी ब्राह्मण यांच्या विरोधात सामाजिक कार्य करणे सोपे नव्हते हिंदू आणि ब्राह्मण वाद हा हजारो वर्षापासून प्रचीलीत आहे परंतु मुस्लीम समजातील काही स्त्री व पुरुष व्यक्तींनी स्वातंत्र्य काळात आणि समाज कार्यात भाग घेतला होता परंतु त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत ९ सरदार मुस्लीम समाजाचे होते त्यांनी महाराष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी लढाया केल्या. ज्यावेळी ब्राह्मण पुरोहितांनी शुद्र व अतिशूद्र समाज्याला सहकार्य करतो म्हणून गोविंद रावाना सांगून जोतीबाला घरातून बाहेर काढले तेव्हा उस्मान व फातिमा शेख यांनीच रहाण्यासाठी त्यांच्या घरात आसरा दिला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह व मनुस्मृति जाळण्यासाठी मुस्लीम समाजाणे जागा दिली होती यावरून मुस्लीम समाजाचा इतिहास समोर येतो, तो डावलून चालणार नाही. वरील घटनेचा विचार करता महात्मा जोतीराव व सावित्रीबाई फुले यांच्या समवेत फातिमा शेख यांनी कार्य केल्याने त्यांच्या बरोबरीने “समाजसुधारक” व “क्रांतिकारक” म्हणून फातिमा शेख यांचाही इतिहास पुढे यायला पाहिजे होता .परंतु बहुजन समाजाने आणि मुस्लीम समाजानेही याकडे लक्ष दिले नाही हि शोकांतिका आहे. अलीकडे चार पाच वर्षात फातिमा शेख याचं कार्य समोर येत आहे.

  फातिमा शेख यांच्या जन्माची निश्चित तारीख नमूद नाही. काही ठिकाणी ती ९ जानेवारी तर २० जानेवारी अशी आहे. आणि निधन ३ जमाडी उस सनी ११ येच २८ आग्स्थ ६३२ असी मुस्लीम सालात नोंद आहे. म्हणजे त्यांचा जीवनाचा कालावधी फक्त पुणे येथील २८ वर्षे आहे. त्यानंतर त्यांची कुठेही नोंद नाही. त्यांची समाधी जन्नातुल बकी येथे आहे. मोहम्मद सल्लाही आलोही बसलं यांची ती कन्या आहे. त्याच्या वडिलाना ७ बायका होत्या. खाडोज्ली तख्ते जिगर आणि हजरत अलीची श्रीक ए ह्यात आणि उन्नती ज्वानिकी सरदार हजरत इमाम हसन आणि इमाम हुसेनी ची आई आहे. बीबी फातिमा शेख याची मजार अजमेर दर्ग्यामध्ये हुजूर गरीब नवाज येथे आहे. बीबी फातीमाच्या मजार वर चादर पेश करून उरूस साजरा करण्यात येतो. हि एकच आठवण मुस्लीम समाजाने ठेवली आहे. कादिर फेज आलम यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या समाधीवर पाण्याचे फवारे उडतात. “फातिमा” नावाचा अर्थ नबी मोहम्मद कि बेटी असा होतो.

  महात्मा जोतीराव फुले यांनी सन १८४८ मध्ये मुलींची शाळा सुरु केल्या नंतर २७ वर्षांनी १८७५ मध्ये सर सय्यद अह्म्म्द खान ने मोहम्मद एग्लो ओरिएन्टल कॉलेजची स्थापना केली. ज्यामुळे मुस्लीम युनिवरसिटीची स्थापना झाली. कदाचित २८ वर्षे पुण्यात राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले असावे. कारण १८५६ नंतर त्यांची माहिती उपलब्ध नाही. पुणे येथे रहात असताना मुस्लीम समाजाच्या मुलीनाही शिक्षण घेण्यास चालना दिली. मोहोल्ला मध्येही जात असत. मुस्लीम महिलांना एकत्र करून शिक्षणाचे महत्व पटवुन दिले. या कामासाठी त्यांनी सायकलचा वापर केला. लांब असणाऱ्या शाळेत त्या बहुजन समाजाच्या मुलांना शिकवण्यासाठी सायकलवर जात असत. सायकल चालवणे म्हणजे स्वतंत्र निरोगी व आनंदी रहाण्याचा सल्ला दिला. त्यांनी सायकल मार्चही काढला होता. ते एक सामाजिक आंदोलन होते.ज्यामुळे महिला व मुली निर्भय आणि स्वावलंबी बनू शकतील.

  १८ व्या शतकाच्या अखेरीस मराठी कालखंडातील पराक्रम करणाऱ्या आणि इंग्रज व पेशवाईच्या अन्याय व अत्याचार होत असलेल्या काळात स्त्री म्हणजे केवळ भोग आणि भोग वस्तू मानली जायची. त्या परिस्थितीत महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बरोबरीने समाज सुधारण्याचा व शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या धाडसी मुस्लीम नेत्या म्हणून फातिमा शेख यांचे नाव घ्यावे लागेल. सर्वसाधारण १६० वर्षापूर्वी दलित, शुद्र, अतिशूद्र बहुजन मुले, मुली यांना शिक्षण देण्याचा आणि सुज्ञान व सज्ञान बनवण्याचा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी जणू काही विडाच उचलला होता.लिहिण्या वाचण्याचे शिक्षण दिल्याशिवाय त्यांच्या ज्ञानाची दारे उघडणारच नाहीत म्हणून सर्वासाठी शाळा सुरु करण्याचा निर्धार या तिघांनी केला होता. त्यांमध्ये फातिमा शेख या पुढे होत्या सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर शेन,दगड,गोटे,अंगावर झेलणाऱ्या फातिमा शेखही होत्या. मुलीना व शूद्रांना शिक्षण देणे हे तथाकथित धर्माच्या विरुद्ध आहे,त्यामुळे आमचा धर्म बुडेल असा सनातन्याचा युक्तिवाद होता. पण या सनातनी लोकांच्या विरोधाला न जुमानता कार्य चालू ठेवले.

  १८ व्या शतकात हिंदू स्त्रीयांची होती त्या पेक्षाही वाईट परिस्थिती मुस्लीम स्त्रीयाची असे. घराबाहेर न जाणे, बुरखा घेणे दर्ग्यात न जाणे, पुरुषांची मर्जी राखणे शिक्षण न घेणे, हवे तेवढ्या मुलांना जन्म देणे,परपुरुषांशी न बोलणे,या नियमांना बांधील असायच्या. परंतु फातिमा शेख यांनी या गोष्टीला विरोध केला होता आणि बहुजन समाजासाठी अविरत कार्य केले.जर सवर्ण आणि हिंदू स्त्रिया शिक्षण घेऊ शकतात तर मुस्लीम स्त्रिया का घेऊ शकत नाहीत, असा प्रश्न उपस्थितीत करीत असत. मुस्लीम धर्मात किंवा कुरणात कुठेही लिहिले नाही कि, मुस्लीम मुलीनी शिक्षण घेऊ नये, चांगले राहू नये, इतर समाजाशी बांधिलकी करू नये, अश्याप्रकारची अशा गोष्टी ना फातिमा शेख विरोध यानी केले आहे.

  चूल आणि मुल, दुसऱ्याच्या अधिकारात जगणे, स्त्री अब्रू वाटणे, हे न करता आपल्या मुलीनी शिक्षण घेतलेच पाहिजे असा सल्ला त्या मुस्लीम व बहुजन स्त्रियांना देत असत. त्यामुळे त्या शिक्षण सम्रानी सह एक समाजसुधारक होत्या. हे मान्य करणे आजच्या समाजाची बांधिलकी आहे. त्यांच्या कार्यामुळे आज ठिकठिकाणी उर्दू शाळा तयार झाल्या आहेत. याची जाण मुस्लीम समाजाने ठेवली पाहिजे.

  महात्मा ज्योतीराव फुले व सवित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतात.त्या प्रमाणेच फातिम शेख यांची जयंती व स्मृतिदिन साजरा करावा. भारतीय जनतेने विशेषतः बहुजन व मुस्लीम समाजाचे कर्तव्य आहे. त्या कोणत्या धर्माच्या व जातीच्या आहेत, यापेक्षा त्यांचे कार्य काय आहे, हे विचारात घेतले पाहिजे.कारण फातिमा शेख यांनी फक्त मुस्लीम समाजासाठी काम केले नसून महात्मा ज्योतिबा व सवित्रीबाई फुले यांच्याबरोबर काम केले आहे. सवित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विदयापीठला देण्यात आले. परंतु फातिमा शेख यांचा कुठेही फोटो, पुतळा नाही. तसेच त्यांच्या विषयी लिखाण केलेले नाही. त्याचं इतिहास लिहिला जात नाही. हि अतिशय वंचित व खेदाची बाब आहे. मुस्लीम समाजाला आजही देशद्रोही समजले जात आहे, हे मनुवादी वृत्ती बदलली पाहिजे. अशा अनेक मुस्लीम स्त्रिया व पुरुषांनी स्वातंत्र्य चळवळीत व समाजकार्यात योगदान दिले आहे, अशा सर्वाना मी नमन करतो.

  -श्री जयद्रथ आत्माराम आखाडे
  लुंबिनी निवास, त्रिवेणीनगर, तळवडे,
  पोस्ट रुपीनगर, ता. हवेली, जिल्हा पुणे
  पिन. ४११०६२
  मोबाईल नं : ८८८८७४७७१५

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,