संत सावता महाराज पुण्यतिथी व गुरुपोेर्णिमा संपन्न

    अमरावती: स्थानिक उपेक्षित समाज महासंघातर्फे दि.२३ जुलै,२०२१ ला संत सावता महाराज संजीवन समाधी दिन आणि गुरुपोेर्णिमेनिमित्त कार्यक्रम महासंघाच्या कार्यालयात संपन्न झाला.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष, उपेक्षित समाज महासंघ,अमरावती.),प्रमुख वक्ते समाजप्रबोधनकर्ते प्रा. अरुण बा. बुंदेले (अध्यक्ष,कै.मैनाबाई बा. बुंदेले प्रतिष्ठान),प्रमुख पाहुणे मा.प्राचार्य श्री टि.एफ. दहिवाडे(अध्यक्ष,तथागत बुद्धभूमि संस्था),समाजभूषण सोे.शालिनी मांडवधरे, श्री श्रीकृष्ण माहोरे (कार्याध्यक्ष,उपेक्षित समाज महासंघ) होते.

    संत सावता महाराज,क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रंतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अध्यक्ष, प्रमुख वक्ते व पाहुण्यांनी अभिवादन केले.प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी “संत सावता महाराज एक ज्येष्ठ व श्रेष्ठ संत होते.कर्मालाच त्यांनी धर्म मानले होते.बहुजन समाजाला समतेची शिकवण दिली.प्रपंच व परमार्थ एकच असल्याचा संदेश त्यांनी कीर्तनातून दिला.गुरुपोेर्णिमेचे महत्त्व सांगताना आदर्श जीवन जगण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे.गुरुतत्व आचरणाला प्रत्येकाने महत्त्व देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करुन “संत सावता महाराज” या स्वरचित अभंगरचनेचे गायन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी संत सावता महाराज यांनी बहुजन समाजाला धर्मांधतेच्या चक्रव्युहातून बाहेर काढून निष्काम कर्म करण्याची आणि पुरोगामी व विज्ञाननिष्ठ होण्याची शिकवण दिली असे प्रतिपादन करुन गुरुपोेर्णिमेचे महत्त्व सांगितले. प्रमुख अतिथी मा.प्राचार्य श्री टि.एफ. दहिवाडे यांनी* “संत सावता महाराज व गुरुपोेर्णिमा” या विषयावर विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन श्री गोविंद फसाटे (कार्यालय सचिव,उपेक्षित समाज महासंघ)व आभार श्री माणिक लोखंडे (सदस्य,फुले-आंबेडकर प्रबोधन मंच) यांनी मानले.कार्यक्रमाला श्री सुधीर वानखडे, सोे.नंदा बनसोड,श्री वसंतराव भडके, प्रा.एन. आर. होले,प्रा.साहेबराव निमकर,श्री डी. एस. यावतकर,श्री मधुकर आखरे व समाजबांधवांची उपस्थिती होती.