नवी दिल्ली : महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका दिला.घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कंपन्यांनी २५.५0 रुपयांची वाढ केली. दुसरीकडे १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील घरगुती सिलिंडरचे ८३४ रुपयांवर गेले आहेत.
तेल कंपन्यांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जात आहे. त्यापाठोपाठ आता घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढविण्यात आल्याने सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणावर प्रभावित होणार आहेत. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दिल्लीतील दर ८३४ रुपयांवर गेले असून मुंबईत हेच दर ८३४.५ रुपये, कोलकाता येथे ८६१ रुपये तर चेन्नई येथे ८५0 रुपयांवर गेले आहेत. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचे दिल्लीतील दर वाढून १५५0 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे हेच दर १६५१.१ रुपयांवर तर मुंबई आणि कोलकाता येथे हे दर क्रमश: १५0७ आणि १६८७.५ रुपयांवर गेले आहेत. जून महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. दुसरीकडे व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर १२३ रुपयांनी वाढविण्यात आले होते.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर ८४ रुपयांनी भडकले
Contents hide