• Mon. Sep 25th, 2023

राज्यात घरोघरी लसीकरण करू

मुंबई:महाराष्ट्रात लवकरच घरोघरी लसीकरणास सुरुवात करणार असल्याची माहिती ठाकरे सरकारने मुंबई हायकोर्टात दिली आहे. घरोघरी लसीकरण करण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने पुण्यापासून प्रायोगित तत्त्वावर सुरुवात करण्यात येईल असे सांगितले आहे. तसेच केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही असेही राज्य सरकारने म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेल्या आणि आजारी नागरिकांना घरोघरी जाऊन लस देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारचा पाचकलमी कार्यक्रम तयार असताना केंद्र सरकराच्या मंजुरीची गरज काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला होता. केरळ, बिहार, झारखंडने परवानगी घेतली होती का? अशी विचारणा करून अंतिम टप्प्यात माघार घेण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच बुधवारी नव्याने भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने बुधवारी मुंबई हायकोर्टात आपण केंद्राच्या परवानगीची वाट पाहणार नसल्याचे सांगितले आहे. केंद्राच्या परवानगीशिवाय घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात करणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. दरम्यान यावेळी राज्य सरकारने हे प्रायोगित तत्त्वावर हे करणार असून याची सुरुवात पुणे जिल्ह्यातून करणार असल्याची माहिती दिली. परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आम्ही मोहीम राबवली होती. त्याच अनुभवाचा फायदा घेत ही मोहीम राबवली जाईल, असे राज्य सरकारने सांगितले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,