नवी दिल्ली:आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा इंग्लंडच्या बेन स्टोक्ससह संयुक्त दुसर्या स्थानावर घसरला आहे. काही दिवसांपूर्वी जडेजाने पहिले स्थान पटकावले होते. आता वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर पहिल्या स्थानी पोहोचला आहे. जडेजा ३७७ रेटिंग गुणांसह संयुक्त दुसर्या आणि होल्डर ३८४ रेटिंग गुणांसह प्रथम स्थानी आहे.
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत ७५२ गुणांसह फलंदाजांच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर घसरला आहे, तर रोहित शर्मा ७५९ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. पंत आणि रोहित व्यतिरिक्त विराट कोहली ८१२ रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन ८६५ रेटिंग गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ९0१ रेटिंग गुणांसह फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर ८९१ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ दुसर्या क्रमांकावर आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा काईल जेमीसनने गोलंदाजांच्या क्रमवारीत १३व्या स्थानी झेप घेतली आहे.
रवींद्र जडेजाचे अव्वल स्थान गेले
Contents hide