• Thu. Sep 28th, 2023

युगे खूप झाली,विटेवरी आता..!

युगे खूप झाली,विटेवरी आता

मनातून गाता,उतर बा
पायरीशी आता,जुळवावी नाळ
उभा किती काळ,बाहेर मी
तुकयाचा गाथा, फिरो शिवारात
फुलून घरात,नांदावया
दगडी कमानी,तुही दगडाचा
माणसांचा ढाचा,हरवला
उपाशी तापाशी, तुझ्या चरणात
त्यांच्या वावरात ,फुलूनी ये
पावलास तुझ्या,संतांचे रे टिळे
तरी कारे पीळे, जगण्याला
सोड पंढरीस,काढ तुही वारी
हरेकाच्या घरी,येऊन जा
चित्र आणि अभंग
– डॉ. विशाल इंगोले
लोणार(सरोवर)
9922284055

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,