• Fri. Jun 9th, 2023

यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळासदृष्य वातावरण

यवतमाळ : जिल्ह्यात चालु आठवड्यात कडक ऊन तापत आहे. यामुळे नागरिकांना उन्हासोबतच गरमीचाही प्रचंड त्रास सहन करावा लाग्त आहे. जिल्ह्यातील ५0 टक्के शेतकर्‍यांनी मृग नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे पेरण्या व धुळपेरण्या आटपवून घेतली.
आता मात्र एक आठवड्यापासुन पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवू पाहत असल्याने शेतकरी वर्ग मोठा चिंताग्रस्त झाला आहे. तडपत्या उन्हामुळे बियाण्यांचे निघालेले कोंब कोमेजुन जात असल्याने व त्याला वाचविण्यासाठी कोणताही इलाज नसल्याने शेतकरी निसर्गाच्या कृपेसाठी प्रार्थना करण्यापलिकडे काहीही करु शकत नाही. हवामान खात्याचा अंदाजही यावेळी चुकल्याने बहुतांश सुज्ञ शेतकरी या विभागावरही तोंड सुख घेत आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात आठवडाभर चांगलाच पाऊस झाला यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली. जवळपास ४0 ते ५0 शेतकर्‍यांनी पेरणी आटपवून घेतली. पाऊस कमी जास्त प्रमाणात सुरुच असल्याने शेतकरी वर्गात समाधानही व्यक्त होत होते. आपली पेरणी साधली या आनंदात शेतीची डवरणी सुध्दा सुरु करण्यात आली होती. मात्र चालु आठवड्यात पावसाचा एकही थेंब पडत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. ग्रामीण भागात निसर्गाला पावसासाठी विनवणी केली जात आहे. धोंडी धोंडी पाणी दे म्हणुन प्राथना करुन धार्मिक कार्यक्रम सुध्दा केले जात आहे. मात्र गेल्या चारपाच दिवसांपासुन उन्हाळा सदृष्य उन तापत असल्याने शेतकरी तर हैराण झालेच आहे. याशिवाय उन आणि गरमीने सर्वसामान्य नागरिक सुध्दा परेशान झाला आहे. आता शेतकर्‍यांजवळ येरे येरे पावसा तुला देतो पैसा म्हणण्यापलिकडे काहीही उरले नाही.
ज्या शेतकर्‍याकडे पाण्याची आणि सिंचनाची सुविधा आहे ते आपापल्या परिने पिकांना पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेती क्षेत्र कोरडवाहू असल्याने सिंचनाची सोय नसल्याने डोळय़ा देखत पिके सुखतांना पाहण्यापलिकडे शेतकर्‍याकडे कोणतीही शक्ती उरलेली नाही. बहुतांश शेतकर्‍यांनी अत्यंत महागडे बियाणे पेरले आहे. आपला एवढा मोठा खर्च वाया जातो की काय या विवंचनेत सध्या तो चिंताग्रस्त झाला आहे. बियाण्याचे भाव वाढण्याबरोबरच यावर्षी खताचेही भाव वाढले आहे. मोठय़ा उत्पन्नाचे स्वप्न रंगवित शेतकर्‍यांनी पेरणी सोबतच खताचीही मात्रा दिली आहे. आता दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास हा दोन्ही खर्च वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्गाने जगाच्या पोशिंद्यावर कृपा करावी अश्या भावना व्यक्त होत आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *