मोटव्हेशन इंडस्ट्री अर्थात कामगारांना कामास प्रेरित करण्याचं शिवधनुष्य पेलणारं क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. या माध्यमातून कार्यप्रेरित झालेले कामगार थोड्या कष्टात अधिक काम करू शकतात. म्हणजे मोटिव्हेशन या एका अमूर्त गोष्टीतून लाखो रुपयांचा मूर्त फायदा होतो. म्हणूनच हजारो रुपये खर्च करून काही कंपन्यांवर कामगारांना ताजंतवानं करण्याची जबाबदारी सोपवली जाते. ती पार पाडणार्या अनेक कंपन्या उदयाला येत आहेत. चांगला पैसा मिळवत आहेत. मोठय़ा कंपन्यांमधल्या कामगारांना आणि अधिकार्यांना वर्तनशास्त्राच्या आधारे काही जीवन कौशल्यं शिकवणं गरजेचं ठरतं. त्यादृष्टीने कामगारांच्या विशेष प्रशिक्षणावर भर दिला जातो. अशा प्रशिक्षणाद्वारे हजारो कामगारांना योग्य प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. ही पद्धत रुढ होत असल्यामुळे या व्यवसायाचा व्याप वाढत जातो आणि त्याबरोबर व्यवसायाची उलाढालही वाढत आहे. मात्र या व्यवसायाला मोठय़ा प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. त्याचबरोबर उत्तम संवाद कौशल्य असेल आणि इतरांना कार्यासाठी प्रेरित करण्याची आवड असेल तर या व्यवसायाचा अवश्य विचार करावा.
मोटिव्हेशन इंडस्ट्री विस्तारतेय
Contents hide