• Mon. Sep 18th, 2023

प्लास्टिक आणि पॉलिमर… भविष्यातील नवीनतम संधी

  विसाव्या शतकाच्या सुरवातीला रसायन शास्त्रामध्ये झालेल्या पाच प्रमुख शोधांमधील पदार्थ म्हणजे प्लास्टिक (काळ 1909 ते 1972). त्या काळचे इतर प्रमुख शोध म्हणजे ‘अमोनिया’ ची निर्मिती, पेनिसिलीन, गर्भनिरोधक गोळ्या आणि लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (LCD). रसायन शास्त्रामध्ये झालेल्या या पाच प्रमुख शोधामुळे आपण आधुनिक जगाची कल्पना करू शकलो.मुळात प्लास्टिक हे पॉलिमर पासून बनविले जाते. पॉलिमरवर यांत्रिक प्रक्रिया (moulding) करून जे उत्पादन बनविले जाते त्याला ‘प्लास्टिक’ म्हणतात. पॉलिमर हे असंख्य अश्या कार्बन आणि हायड्रोजन रेणू पासून बनलेले असतात. कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) शुद्धीकरण प्रक्रियेत जे घटक बाहेर पडतात त्यापासून पॉलिमर बनविले जाते. प्लास्टिक हे अल्पावधीतच सर्व क्षेत्रांमध्ये वापरले जाऊ लागले. कारण की त्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे. प्लास्टिक हे हलके, टिकाऊ, मजबूत, विद्युतरोधक आणि पुनर्वापर योग्य असल्यामुळे आज पारंपारिक इतर मटेरीअलसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  प्लास्टिकचे विविध उपयोग :

  प्लास्टिक हे अल्पावधीत सर्व क्षेत्रामध्ये वापरले जाऊ लागले कारण की त्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे. प्लास्टिक हे हलके, टिकाऊ, मजबूत, विद्युतरोधक आणि पुनर्वापर योग्य असल्यामुळे आज पारंपारिक इतर मटेरीअल साठी पर्याय ठरत आहे. रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी करायला बसल्यास असं लक्षात येईल की, वस्तूंच्या 99 टक्के वस्तू या प्लास्टिकपासून बनविलेल्या आहेत. जे प्लास्टिक वाहनात वापरले जाते त्याला साधारणपणे सामान्य नागरिक फायबरचे आहे असे म्हणतात. मात्र, ते प्लास्टिक आहे. सध्या उद्भवलेल्या कोविडच्या संकटामध्ये प्लास्टिक (पी पी कीट, मास्क, फेस शिल्ड, हँड ग्लोज च्या स्वरुपात) ने सामान्य जनतेचे, रुग्णाचे, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या नर्सेस, डॉक्टरांचे आरोग्य सांभाळण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे ते आपण बघितलेच आहे.

  टूथब्रशपासून ते बसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खुर्च्या, घरातील भांडी, बादली, छत्र्या, रेनकोट, चप्पल, बूट आणि कपडे, सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सुद्धा वापरले जातात. जसे मोबाईलची डिस्प्ले स्क्रीन, त्याच्या बॅटरीमध्ये, फ्लॅट पॅनलटीव्ही मध्ये, कॉम्पुटर, लॅपटॉपच्या की-बोर्ड मध्ये, मदर बोर्ड मध्ये वापरतात. मुळात प्लास्टिकच्या शोधामुळे कॉम्पुटर आणि तत्सम वस्तू ह्या आकाराने लहान व हलक्या झाल्या आहेत. तसेच वाहतूक उद्योगामध्ये प्लास्टिकचा वापर होतो तो वापर 40 टक्के च्या जवळपास आहे. उदा. हेड लाईट आणि रेअर लाईटचे कव्हर, टायर, हेल्मेट, पेट्रोलची टाकी, इत्यादी. त्यामुळे वाहनाचे वजन कमी झाले असून इंधनाची खपत कमी झाली आहे. प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर इमारत बांधकाममध्ये सुद्धा वापरले जाते उदा. खिडक्या, फ्रेम, दरवाजे, पाण्याच्या टाक्या, प्लंबिंग, प्लायवूड, आणि रंग. आज इमारतीला जे रंग दिले जातात त्यामध्ये सुद्धा प्लास्टिक असते. प्लास्टिक विद्युतरोधक असल्यामुळे सर्व प्रकारचे स्विचेस, इलेक्ट्रिक बटन्स, स्वीच बोर्ड, सर्व प्रकारच्या केबल्स मध्ये वापरले जाते. खेळाचे साहित्य उदा. टेनिसच्या रँकेट, गोल्फ स्टीक, सर्फ बोर्ड, बोट, फुटबाल, उंच उडीचा बांबू, शूज, सॉक्स, खेळाडूचे कपडे, स्पोर्ट्स साईकल, स्पोर्ट्स रेसिंग कार इत्यादी.

  प्लास्टिक/ पॉलिमर थोड्या वेगळ्या स्वरुपात म्हणजे कॉम्पोझिट च्या स्वरुपात लष्करामध्ये वापरल्या जाणाऱ्या सामुग्रीमध्ये वापरले जाते. उदा. बुलेट प्रूफ जॅकेट्स, रॉकेटलौन्चेर, मिसाईलचे भाग, हेलिकॉप्टरचे भाग, लढाऊ विमानाचे भाग इत्यादी. वैद्यकीय क्षेत्रामध्ये, कृत्रिम दात हे ॲक्रीलिक प्लास्टिक पासून बनवतात, इंजेक्शन, डोळ्यात वापरण्यात येणाऱ्या काँटॅक्ट लेन्सेस, चष्मे, कृत्रिम पाय, हृदयातील झडपा, शरीरात बसवलेले कृत्रिम पेसमेकर, गोळया औषधीच्या पॅकिंग साठी, वैद्यकीयउपकरणे इत्यादी. प्लास्टिकच्या वापराला आज तरी तितका ताकदीचा पर्याय समोर दिसत नाही.

  प्लास्टिक/ पॉलिमरचावाढता उद्योग :

  उपरोक्त वस्तूंच्या निर्मितीत प्लास्टिक वापरामुळे प्लास्टिक उद्योग हा निरंतर वाढत आहे. प्लास्टिक/पॉलिमर उद्योगाची दरवर्षी 10 ते 35 टक्के वाढ होत आहे. या उद्योगाच्या वाढीसाठी केंद्र शासनाने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत.

  संधीची द्वारे :

  पॉलिमर इंजिनिअरींग क्षेत्रा मध्येमॅन्यूफॅक्चरींग, प्रोसेसिंग, टेक्नो कमर्शियल, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट, व्क्वालिटी कंट्रोल, मोल्ड अॅण्ड प्रोडक्ट डीझाईनडेव्हलपमेंट, थ्री डी प्रिंटिंग विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध आहे.

  नव्या संधी

  प्लास्टिकचे जर योग्यरित्या व्यवस्थापन (संकलन व पुनर्प्रक्रिय) केले तर प्लास्टिकचा कचरा तयार होण्यापासून अटकाव होऊशकतो. वापरलेल्या प्लास्टिकच्या पुनर्वापरच्या अनेक पद्धती उपलब्ध किंबहुना संशोधित केल्या जात आहे. उदा. पर्यावरण पूरक पॉलिमर्स बनविणे, काम्पोस्टेबल पॉलिमर्स बनविणे, बायोपॉलिमर्स ची निर्मिती करणे इत्यादी. अशा क्षेत्रा मध्ये तंत्रज्ञान विकसित करण्यची संधी पॉलिमर इंजिनीअर ला मिळत आहे. तसेच प्लास्टिक पुनर्प्रक्रिया उद्योगांमध्ये नवीन संधी मिळत आहे. त्यामुळेच या उद्योगांमध्ये प्लास्टिक/पॉलिमर क्षेत्रामधील कुशल मनुष्यबळाची आज नितांत आवश्यकता आहे. त्यामुळेच हा आभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना हमखास रोजगार उपलब्ध आहे, शिवाय त्यांना इंजिनियरिंग पदवीचा पर्यायही उपलब्ध आहे.

  महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक/ पॉलिमर अभियांत्रिकीचा पदविका/ पदवी अभ्यासक्रम खालील संस्थेत उपलब्ध आहे.

  शासकिय तंत्र निकेतन अमरावती, नाशिक आणि मिरज (10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी) तीन वर्षाचा (Diploma) पदविका अभ्यासक्रम, Institute of ChemicalTechnology, Mumbai येथे B.Tech. MTech. आणि PhD आभ्यासक्रम उपलब्ध आहे (12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी ), लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर येथे B.Tech.ची पदवी (12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी), Maharashtra Institute Of Technology, औरंगाबाद येथे B.Tech ची पदवी आभ्यासक्रम (12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी), MIT World Peace University, पुणे येथे B.Tech, M.Tech चा पदवी आभ्यासक्रम (12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे B.Tech, MTech. आणि PhD पदवी आभ्यासक्रम उपलब्ध आहे (12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी)

  -प्रा. देवेंद्र गावंडे
  शासकीय तंत्र निकेतन, अमरावती

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,