भद्रावती : नॅशनल ह्यूमन वेलफेयर असोसिएशन दिल्लीद्वारा युथ आयकॉन अवॉर्ड-२0२१ पुरस्कार सोहळा तथा युथ समिट येत्या ४ जुलैला नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात भद्रावती येथील युवा कार्यकर्ती प्रीती नितीन साव यांची निवड ‘युथ आयकॉन अवॉर्ड २0२१’साठी करण्यात आली आहे. प्रीती साव या मागील ५ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, योगा व निसर्गोपचार अश्या बहुआयामी क्षेत्रात कार्य करीत आहेत. तसेच त्या चंद्रपूर जिह्याच्या जीवनदायीनी मल्टीपर्पस फाउंडेशनच्या महिला विभागाच्या जिल्हा प्रमुख या पदावरून योग तथा निसर्गोपचारच्या प्रसार प्रचार करीत आहेत. त्यांना सदर अवॉर्ड नागपूर येथे भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
प्रीती साव यांना युथ आयकॉन अवॉर्ड जाहीर
Contents hide