नाशिक:इगतपुरी तालुक्यातील मायदरा-धानोशी गावच्या सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे या प्रसूती झाल्यानंतर अवघ्या ९ दिवसात आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्या आहेत. त्या आपल्या नऊ दिवसांच्या बाळाला घेऊन ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीला हजर झाल्या आहेत. अशा अवस्थेत त्या बैठकीला हजर झाल्याने उपस्थित अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी देखील त्यांचे स्वागत केले आहे. प्रसूती झाल्यानंतर बांबळे यांना दोन ठिकाणी आईपणाची भूमिका बजवावी लागत आहे.
मायदरा-धानोशी गावच्या सरपंच असणार्या पुष्पा बांबळे यांची नऊ दिवसांपूर्वी प्रसूती झाली होती. त्यांच्या घरात लक्ष्मीच्या पावलाने चिमुकलीने आगमन केले. प्रसूतीनंतर आणखी काही दिवस त्यांनी आराम करण्याची आवश्यकता होती. असे असतानाही त्यांनी अवघ्या ९ व्या दिवशी ग्रामपंचायतीच्या बैठकीला हजर झाल्या आहेत.
दरम्यान त्यांनी गावातील पाणीपुरवठा, विजेचा प्रश्न, दलित वस्तीतील मंजूर पथदीप विकास कामे, शिवार रस्ते आदी प्रश्नांचा आढावा घेतला.
दरम्यान ग्रामसेवक नितीन हेंबाडे, उपसरपंच, चंद्रभागा, बहिरू केवारे आणि अन्य ग्रामपंचायत सदस्याने बांबळे याचे स्वागत केले होते.
यावेळी बांबळे म्हणाल्या की, सरपंच पदाचा कार्यभार स्विकारताना मी ग्रामस्थांच्या प्रश्नासांठी तत्पर राहिले असे आश्वासन दिले होते. त्यामुळे गावच्या सरपंच या नात्याने मी गावातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी नऊ दिवसांच्या बाळासह मी बैठकीला उपस्थित राहिले आहे. आणि हे माझे कर्तव्यचे आहे, असे मत पुष्पा बांबळे यांनी या बैठकीत व्यक्त केले आहे.
त्यांच्या जिद्दीचे गावकर्यांकडून तोंड भरून कौतुक केले जात आहे. तसेच गावच्या हिताचा विचार करणार्या सरपंच लाभल्याने गावकरीही खूश आहेत. सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली आहे, असेही गावकर्यांनी सांगितले आहे.
(छाया : संकलित)
प्रसूतीच्या नवव्या दिवशीच कर्तव्यावर रुजू ; सरपंच महिलेला गावकर्यांचा सलाम
Contents hide