• Fri. Jun 9th, 2023

पो. अधीक्षकाविरुद्ध विशेषाधिकार भंगाची तक्रार !

अमरावती:अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने गेल्या २0 जून २0२१ रोजी अमरावती विधानसभा मतदार संघ कार्यक्षेत्रात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमातून अमरावतीच्या आ. सुलभा खोडके यांना डावलण्यात आले .अशा प्रकारे स्थानिक लोकप्रतिनिधीचा जाणीवपूर्वक अवमान केल्यामुळे आ.सुलभा खोडके या आगामी पावसाळी अधिवेशनात जिल्हा पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण डॉ. हरिबालाजी एन.यांचे विरुद्ध हक्कभंग आणणार असून या संदर्भातील तक्रार आ.सुलभा खोडके यांनी महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष महोदयांकडे केली आहे. अमरावती विधानसभा मतदार संघ कार्यक्षेत्रांतर्गत येणार्‍या पोलीस क्रीडांगण ,आशियाना क्लब , मंथन सभागृह नूतनीकरण , रक्षादीप अभियान तसेच पोलीस हेल्थ अँप अशा विविध कार्यक्रमांचे उदघाटन गेल्या रविवार दिनांक २0 जून २0२१ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अँड यशोमती ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले . या सर्व शासकीय कार्यक्रमाला अमरावतीचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पदर्मशी प्रभाकरराव वैद्य , आयोजक पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामिण डॉ.हरिबालाजी एन ,अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे आदी सहित अन्य मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी केले होते.मात्र या कार्यक्रमातून आ. सुलभा खोडके यांना डावलण्यात आले. हा एक शासकीय कार्यक्रम असतांना या कार्यक्रमाचे आ. सौ. सुलभाताई खोडके यांना आमंत्रण कळविण्यात आले नाही . व त्यांच्या नावाचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेमध्ये करण्यात आला नाही. तसेच कोनशिलेवरही त्यांच्या नावाचा उल्लेख नाही . आ. सुलभाताई खोडके या अमरावती विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत असून या शासकीय कार्यक्रमाला त्यांना जाणून बुजून डावलण्यात आले असल्याचे यावरून दिसून येते . अशा प्रकारे स्थानिक लोकप्रतिनिधीचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा प्रकार कार्यक्रमाचे आयोजक अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन यांनी केला आहे .याकरिता आ. सुलभा खोडके यांनी पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या विरुद्ध महाराष्ट विधानसभा नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाची सूचना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे . सदर प्रस्ताव स्वीकृत करून विशेष हक्क भंग समितीकडे पुढील कारवाईकडे पाठविण्यात यावी अशी सूचना देखील देखील आ .सुलभा खोडके यांनी पत्रातून केली आहे. तसेच आगामी पावसाळी अधिवेशना दरम्यान मुद्दा उपस्थित करून आ.सुलभा खोडके या अमरावती एसपींविरूद्ध हक्कभंग आणणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *