• Mon. Sep 25th, 2023

पॅकेज नव्हे, मदत देणारा मुख्यमंत्री

    कोल्हापूर : पॅकेज घोषित करणारा नाही, तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी दौर्‍यात केले.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकणातील काही जिल्हय़ांमध्ये अतवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पूरग्रस्तांसाठी सरकराने भरीव मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर बोलताना मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीवरील कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आणि विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे सांगितले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,