• Thu. Sep 28th, 2023

पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली करू नका – ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई : मुसळधार पावसामुळे पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणातही पुराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला असून परिस्थितीची पाहणी केली आहे. पूरग्रस्तांसाठी अद्याप कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नसून लवकरच ती जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. दरम्यान पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारने दिलासा दिला असून वीजवसुली न करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे.
नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली करू नये असे आदेश दिले आहेत. या ठिकाणी वसुली होणार नाही. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर वीजबिलंदेखील दिली जाणार नाहीत. लोकांचे खूप मोठं नुकसान झाले आहे. परिस्थिती निवळल्यानंतर वीज बिल देत असतानाही कितपत दिलासा देऊ शकतो याचा विचार समिती करत आहे. दरम्यान नितीन राऊत यांनी यावेळी वीजबिल माफ करण्यासंबंधंचा निर्णय मंत्रिमंडळाकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,