• Sun. May 28th, 2023

पूरग्रस्तांना दीपाली सय्यदकडून दहा कोटींची मदत

    मुंबई : महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळं प्रचंड मोठं नुकसान झालंय. अनेक भागात पाणी साचून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुराचे पाणी जरी ओसरले असले; तरी तेथील परिस्थिती अजूनही सुधारली नाही. या पूरग्रस्तांपयर्ंत मदत पोहोचवण्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी जनजागृतीचं काम हाती घेतलं आहे. अनेक कलाकार आर्थिक मदत करताना दिसत आहेत.

    दरड कोसळलेल्या आणि पुराचा तडाखा बसलेल्या भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर कोकणातील लोकांना मदत करण्यासाठी चहूबाजूंनी मदतीचे हात पुढे येत आहेत. दीपाली सय्यद यांनी भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागातील रग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेत तिथल्या नुकसानीची पाहणी केली आहे.पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेत हे सर्व भयंकर आहे. नागरिकांचं बोलणं ऐकूण अंगावर काटा येतोय. लोकांचे संसार उध्वस्त झालेत. काही उरले नाहीये. माहित नाही देव अजून किती परीक्षा घेणार आहे. अशा शब्दांत दिपाली यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *