• Tue. Sep 26th, 2023

पुरस्कारप्राप्त प्रगत शेतकर्‍यांच्या सत्कारप्रसंगी जिल्हाधिकारी यांचे आवाहन

यवतमाळ : आदर्श शेतकरी म्हणून नावलौकिक मिळविणार्‍या प्रगत शेतकर्‍यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांना प्रगतीशील शेती करण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग व भाजीपालाचे विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल राज्य शासनाचा उद्यानपंडित पुरस्कार- २0१९ प्राप्त करणारे गाजीपूर ता. दारव्हा येथील प्रगतिशील शेतकरी जगदीश चव्हाण व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार- २0१९ प्राप्त करणारे खैरगाव ता. केळापूर येथील महेंद्र नैताम यांचा आज कृषी दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.के.डी. ठाकूर, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर.एन. काटकर, पुणे येथील कृषी उपसंचालक जांबवंत घोडके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी विज्ञानाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा व अभ्यासाचा फायदा शेतकर्‍यांना जादा पीक उत्पन्नातून मिळावा व त्यातून शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी कृषी वैज्ञानीक व कृषी अधीकार्‍यांनी नवनवीन संशोधन करून ते शेतकर्‍यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश नेमाने यांनी तर संचालन मयुर ढोले यांनी केले. कार्यक्रमाला प्रगतीशील शेतकरी, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, कृषी वैज्ञानिक डॉ. सुकेशनी वाने, तालुक कृषी अधिकारी श्री. धानोडे, तांत्रीक अधिकारी श्री. पिंपरखेडे तसेच कृषी विज्ञान केंद्र व जैवतंत्रज्ञान विद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,