• Tue. Sep 26th, 2023

तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे:जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३६ वा पालखी सोहळा गुरुवारी पार पडला. अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित पालखीने प्रस्थान ठेवले आहे. प्रदक्षिणा घालून पादुका मुख्य मंदिरात विसावणार आहेत. त्यानंतर १९ जुलै रोजी एसटी बसमधून पंढरपूरला रवाना होणार असल्याचे देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे.
देहू नगरी दरवर्षी ग्यानबा तुकारामाच्या गजराने दुमदुमून जाते. मात्र, गेल्यावषीर्पासून करोना महमारीचं संकट निर्माण झालेले असल्याने, अगदी मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थित यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला आहे. मुख्य मंदिराच्या इथून पालखीने दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रस्थान ठेवले.
देहू नगरीत महाराष्ट्रासह इतर ठिकाणाहून वारकर्‍यांनी येऊ नये असे आवाहन विश्‍वास्थांकडून करण्यात आले होते. त्याला वारकरी संप्रदायाने प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, संपूर्ण देहूनगरीत आज शांतमय वातावरण आहे. दरम्यान, पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिरात विसावणार असून १९ जुलै रोजी एसटीमधून पंढरपूरला रवाना होणार आहे.
संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने आषाढी वारीदरम्यान लाखभर भाविकांसाठी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून अन्नदान सोहळा आयोजित करणार्‍या देहूगावातील संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाचा तीन दिवसीय अन्नदान सोहळा यंदा सलग दुसर्‍या वर्षी करोनामुळे खंडित झाला आहे. गेल्या वर्षी करोनाविषयक मदतकार्यात योगदान देणा?्या मंडळाच्या वतीने यंदा अन्नदानाऐवजी पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,