मुंबई:राष्ट्रीय डॉक्टर दिवसच्या निमित्ताने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने जगभर थैमान माजवले आहे. या पासून सर्वांनाच वाचवणारे देवदूत हे डॉक्टर आहेत. त्यामुळे ‘डॉक्टर डे’च्या विशेष दिनानिमित्त आरोग्यमंत्र्यांनी सर्वच डॉक्टर तसेच नर्स आणि आरोग्य कर्मचार्यांचे पत्र लिहून आभार मानले आहेत. तसेच कृषीदिन असल्याने सर्व बळीराजाचेही आभार आरोग्यमंत्र्यांकडून मानण्यात आले आहेत.
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या आपणा सर्वाना खूप शुभेच्छा. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाविरुद्ध लढाईत आपण अहोरात्र मेहनत करुन सामान्यांना जीवनदान देण्याचे काम करीत आहात. आपल्या कार्याला माझा सलाम! खरं म्हणजे आपल्या कौतुकासाठी शब्द कमी पडावेत असे आपण काम करीत आहात. योगायोग म्हणजे आज (१ जुलै) रोजी महाराष्ट्रात कृषी दिनही साजरा केला जातो. कोरोनाच्या कठीण काळात अन्नदाता शेतकरी आणि जीवनदाता डॉक्टर यांच्या कष्टामुळे सामान्यांना हा कठीण काळ सुसहय़ होण्यास मोठी मदत मिळाली आहे. त्यामुळे डॉक्टरांसोबतच बळीराजालाही मी शतश: धन्यवाद देतो. असे पत्र त्यांनी डॉक्टरांना उद्देशून लिहले आहे.
डॉक्टरांचा असा एक दिवस असू नये. कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का? तो दररोज आपल्याला हवा असतो. आपण सारेचजण दीड वर्षापासून कोरोनाला हरविण्याच्या ध्येयाने लढतो आहोत. आपल्यासोबत आरोग्य कर्मचारी, पोलिस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. या सर्वाच्या प्रयत्नामुळे कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यात यश येत आहे.
डॉक्टरांना देवदूत संबोधत आरोग्यमंत्र्यांनी मानले कर्मचार्यांचे आभार
Contents hide