• Mon. Sep 25th, 2023

गुरु वंदन..!

गुरुचा सन्मानं | करावे वंदनं

सुहास्य वदन | सदोदित
ज्ञान उधळती | गुरु तेचि होती
मुक्त हस्ते देती | ज्ञानदानं
गुरु प्रती ठेवू | आदराचे स्थान
देवू तया मानं | जीवनात
संकट समयी | दाविती जे मार्ग
शिकवी सन्मार्ग | तेचि गुरु
ज्ञानाची शिदोरी | सोबत जो देई
जशी देई माई | लेकराला
उदात्त विचार | असे ज्याचे पाठी
बांधुनिया गाठी | ठेवितो जो
समाजा करवी | असे ज्याचे हित
पसरे ना मिथ | गुरु तेथे
आबाल वृध्दांना | जवळ जो करी
हृदयाशी धरी | गुरु माना
दुःखीत हे जन | देखवे ना डोळा
पोटी येई गोळा | गुरु खरा
गुरुचे आसन | सदा आम्हा मान
द्यावे हेचि दान | मुक्त हस्ते
स्मरण गुरुचे | आम्हा ठायी ठायी
ऋण पायी पायी | चुकवावे
करावे प्रयत्न | ऋणातून मुक्त
देवू मनसोक्त | गुरुजींना
गुरु माता पिता | गुरु बंधू जन
करुया वंदन | मनोभावे
– पी के पवार
सोनाळा बुलढाणा
९४२१४९०७३१

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,