• Mon. Sep 25th, 2023

एक झाड लाव मित्रा

एक झाड लाव मित्रा फक्त तू

तुझी भावी पिढी काढेल तुझं नाव
बघ मग किती निसर्ग रम्य वाटेल
तुझं शहर असो की गाव.
झाड ही बोलेन तुझ्याशी
आणि गाईल मंजूळ गाणी
मग वेळेवरच मिळेल तुला
फळे फुले आणि अन्न पाणी
दुष्काळाचे सावट देशावरचे
जाईल दूर दूर अगदी पळून
चला संकल्प करू या आता
एक झाडाचा आपण सारे मिळून
उन्हातानात विसावा मिळेल
फक्त वाढवून एक झाड
मुलांप्रमाणेच कर तू आता
प्रत्येक झाडाचे मनापासून लाड
नतमस्तक हो त्या झाडापुढे
जे देते तुला आतुष्यभर छाया
ह्रदयातून तू समजून घे
ही आभाळासारखी माया
झाड तोडू देऊ नकोस तू
इथे कुणाला कधी चुकून
श्रीमंत होणार नाही तू
झाड बांधावरचे विकून
गणेश रामदास निकम
चाळीसगाव गणेशपूर
मो.न.७०५७९०४६७७
९८३४३६१३६४

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,