अकोला : अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच यांच्या वतीने “समकालीन कवितेत अरूण विघ्ने यांच्या कवितांचे योगदान” या विषयावर वऱ्हाडी साहित्य जागर ऑनलाइन चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ साहित्यिक अरूण विघ्ने यांच्या समग्र साहित्यावर आयोजित परिसंवादाचे अध्यक्ष जेष्ठ वऱ्हाडी साहित्यिक विजय बिन्दोड होते. त्यांनी अरुण विघ्ने यांच्या कविता केवळ संस्कारी नसून संस्कारक्षम असल्याचे निरीक्षण नोंदवले. चर्चासत्राच्या सुरुवातीला जेष्ठ साहित्यिक अरूण विघ्ने यांनी भूमिका कथनाच्या माध्यमातून त्यांचे साहित्य विषयक महत्त्वाचे विचार मांडलेत… सहभागी वक्ते सुप्रसिद्ध समीक्षक प्रशांत ढोले यांनी अरूण विघ्ने यांच्या कवितांची बलस्थाने विशद करून या कविता वास्तव मांडून भविष्याच्या वेध घेणाऱ्या आहेत असे प्रतिपादन केले. सहभागी दुसरे वक्ते सुप्रसिद्ध कवी संदीप धावडे यांनी अरूण विघ्ने यांच्या कविता ‘साहित्यिक जागल’ असून त्या ‘जगण्याची भाषा’ आहेत असे विविध संदर्भ देऊन स्पष्ट केले. समीक्षक तथा निवेदक प्रा. महादेव लुले यांनी वऱ्हाडी साहित्य जागर ऑनलाइन चर्चासत्राचे उत्तम सूत्रसंचालन तर अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचे उपाध्यक्ष निलेश कवडे यांनी आभार प्रदर्शन केले.
अरुण विघ्ने यांच्या कविता फक्त संस्कारी नसून संस्कारक्षम – विजय बिंदोड
Contents hide