Header Ads Widget

करिअर र्मचंट नेव्हीतले

जगभरात भ्रमंती करण्यासोबतच विविध ठिकाणच्या संस्कृतींची ओळख करून घेणं र्मचंट नेव्हीतल्या करीअरमुळे शक्य होतं. र्मचंट नेव्ही हा करीअरचा धाडसी पर्याय आहे. यात तुम्हाला वर्षातले सहा महिने बोटीवर रहावं लागतं. म्हणजे एवढा काळ तुम्ही समुद्रात असता. चहूबाजूला निळंशार पाणी खुणावत असतं. म्हणूनच उत्तम आणि धाडसी करीअरच्या विचारात असाल तर र्मचंट नेव्हीचा मार्ग तुम्ही निवडू शकता. र्मचंट नेव्हीमध्ये डेक कॅडेट किंवा नॅव्हिगेटिंग अधिकारी म्हणून तुम्ही काम करू शकता. हे अधिकारी बोट, इंधनाची टाक, कार्गो यांच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडतात. र्मचंट नेव्हीच्या माध्यमातून माल वाहतूक होते. बोटीत माल भरणं आणि उतरवणं या कामांकडे डेक कॅडेटला लक्ष ठेवावं लागतं. पुरेशा अनुभवानंतर तुम्ही थर्ड ऑफिसर, सेकंड ऑफिसर आणि चीफ ऑफसर अशी पदं मिळवू शकता. र्मचंट नेव्हीमध्ये जाण्यासाठी फिजिक्स, केमस्ट्री आणि गणित हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. यासोबतच बीएससी नॉटिकल सायंस, बीएससी मरीन, बीएससी मरीन केटरिंग असे अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. त्यानंतर इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीतर्फे आयोजत करण्यात येणारी आयएमयू-सीईटी प्रवेश परीक्षा तुम्ही देऊ शकता. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमधून नॉटिकल सायंसमध्ये बीएससी करू शकता. जेईई परीक्षाही तुम्हाला देता येईल. एक कॅडेट म्हणून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बोटीवर रूजू होण्याआधी तुम्हाला मेरिटाइम प्रशिक्षण संस्थेतून एक वर्षाचं प्री-शीप ट्रेनिंग घ्यावं लागेल. यासोबतच तुम्ही ज्युनिअर इंजिनिअर म्हणूनही काम करू शकता. पुढे थर्ड इंजिनिअर, सेकंड इंजिनिअर आण चीफ इंजिनिअर ही पदं मिळू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या