Header Ads Widget

राज्यात दुसरी लाट उलटू शकते ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

मुंबई : लोकांनी गर्दी न टाळल्यास तिसर्‍या लाटेपूर्वीच दुसरी लाट उलटू शकते, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यांच्याहस्ते आज, सोमवारी मालाडच्या कोविड रुग्णालयाचा उद््घाटन सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. गर्दी करु नका, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी दुसरी लाट उलटू नये आणि तिसरी लाट येऊ नये अशी माझी प्रार्थना असल्याचे म्हटले. मालाडचे कोविड रुग्णालय तात्पुरते असले तरी अद्ययावत आहे. सुविधांत, उपचारांत कुठेही तडतोड नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. राज्यात लसीकरण वेगाने सुरु आहे. जसजसा लसींचा पुरवठा होत जाईल. तसे लसीकरण आणखी वाढेल. रोज १५ लाख लसीकरण करण्याची तयारी असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने १७ एप्रिल रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) मालाडच्या वलनाई गाव येथे २१७0 खाटांचे सर्मपित कोविड रुग्णालय बांधण्याचे निर्देश दिले होते. यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच एमएमआरडीएने २८ जून रोजी हे सर्मपित कोविड-१९ रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्त केले. याच कोविड रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. हे कोविड-१९ रुग्णालय र्जमन तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आले आहे. ते अग्निरोधक आणि पर्यावरणास अनुकूल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या