Header Ads Widget

निळ्या पाखरांनी !

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी
मुक्ती गीत गावे निळ्या पाखरांनी

उपाशी रहा पण, पुरेशे शिकावे
सज्ञानी बणावे,निळ्या पाखरांनी

कमाई करूनी, तयातून थोडे
महादान द्यावे,निळ्या पाखरांनी

जपा स्वाभिमाना, अशोका स्मरूनी
विहारात जावे, निळ्या पाखरांनी

न हुरळून जाता, मना आवरावे
स्वतःसिद्ध व्हावे निळ्या पाखरांनी

भिमाच्या रथाला, पुढे नेत जावे
दिशादर्श व्हावे,निळ्या पाखरांनी 

तुझ्या लेखनीने, जगा जागवावे
स्वशील जपावे निळ्या पाखरांनी

अरुण विघ्ने

(चित्र कुणाचे ज्ञात नाही )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या