Recent in Technology

Advertisement

Breaking News

"पथदर्शक "अनितकालिक आंदोलनाला दिशा दाखवेल

(प्रा.विलास भवरे) 
पुसद : आज दिनांक 27.6.2021ला "पथदर्शक "अनितकालिकाचे प्रकाशन, रमाबाई माध्यमिक विद्यालय,सिंदी मेघे येथे संपन्न झाला.यावेळी मान्यवर धम्मा कांबळे म्हणाले"जगाच्या पुनर्रचना करण्याकरीता पथदर्शक काम करेल.आंबेडकरी आंदोलनासाठी मुखपत्राची गरज असते.ही गरज पथदर्शक पुर्ण करेल.पथदर्शक अनियतकालिक आंबेडकरी आंदोलनाला ऊर्जा प्रदान करेल."सामाजिक न्याय दिनाच्या पर्वावर प्रकाशन सोहळा संपन्न झाला.मानवी विचारात बदल करण्याचे कार्य अनितकालिक करते.हे विचार प्रजासत्ताक शिक्षक संघाचे  प्रमुख अरूणकुमार हर्षबोधी यांनी व्यक्त केले.
येणा-या पिढीला "पथदर्शक "दिशा देण्याचे कार्य करेल.आपली लेखणी व वाणी चार भिंतीपुरती मर्यादीत ठेऊ नका...उपेक्षितांचे फार मोठे जग आहे.जीवनमूल्ये उदात्त होऊ द्या.हा बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आजच्या साहित्यिक मंडळींनी रूजविला पाहिजे. वर्तमान भयानक आहे.यातून पथदर्शक दिशा दाखवेल.असे विचार प्रा.विलास भवरे, पुसद यांनी व्यक्त केले.
पथदर्शक अनियतकालिक यातील संपादकिय लेख उत्तम आहे.या पथदर्शकची एक रोखठोक भूमिका आहे.असे अशोक खंन्नाडे सर (केंद्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल )अनितकालिकेच्या संदर्भात भाष्य केले.पथदर्शक अनियतकालिकेच्या माध्यमातून भविष्यात कविता,गझल कार्यशाळा, साहित्य कलाकृतीला पुरस्कार आयोजन,साहित्य संमेलन आयोजन इ.उपक्रम घेतल्या जातील.साहित्यिकांना कृतीयुक्त कार्यक्रम पथदर्शक या अनियतकालिकेच्या माध्यमातून घेतल्या जातील.असे भाष्य कवी संजय ओरके यांनी व्यक्त केले.बहारदार संचालन डाॅ.अरविंद पाटील सर यांनी केले.प्रस्तावना संपादक जगदीश भगत यांनी केले.डाॅ.अरविंद पाटील सरांचा सत्कार करण्यात आला.त्यांना पी.एच.डी.भेटल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. प्रकाश जिंदे, सुयश डहाके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आभार प्रकाश कांबळे सरांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र गणवीर सर,रसपाल शेंदरे, सुषमा पाखरे, अलोक रामटेके, सनिल रामटेके, प्रा.राजेश ड॔भारे ,प्रशांत जिंदे,किशोर ढाले, शशिकांत थुल,उमेश गणवीर, प्रशांत ढोले यांनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code