Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

सिंधू ऑलिम्पिकसाठी भारताची ध्वजवाहक?

नवी दिल्ली : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू आणि रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूकडे टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाच्या ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकासह एक पुरुष आणि एक महिला अशा दोन ध्वजवाहकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा महिनाअखेरीस होणार आहे. मागी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या दोन जणांनी पदके जिंकली होती. यापैकी साक्षीला यंदा ऑलिम्पिक पात्रता गाठण्यात अपयशी आले आहे. त्यामुळे महिला ध्वजवाहकाच्या शर्यतीत सिंधूला आव्हान नसेल. पुरुष ध्वजवाहकाची जबाबदारी भालाफेकपटू नीरज चोप्रा, टेबल टेनिसपटू शरथ कमाल, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि बॉक्सिंगपटू अमित पंघाल यांच्यापैकी एकाकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code