Header Ads Widget

पीककर्जासाठी ओटीएस योजनेचा लाभ घ्यावा

यवतमाळ: ज्या शेतकरी सभासदांकडे बँकेचे जुने कर्ज थकीत झाल्यामुळे त्यांना नवीन पीककर्ज मिळत नाही. अशा शेतकर्‍यांनी प्रत्येक बँक पातळीवर असलेल्या एकमुस्त कर्ज परतफेड योजनेचा (ओटीएस) लाभ घ्यावा. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना बँकेचे धोरणानुसार भरणा करावयाचे कर्ज रक्कमेमध्ये सवलत मिळेल व बँकेकडून रु. ३ लक्ष पयर्ंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होऊ शकेल, असे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले. खरीप पीक कर्जवाटपाबाबत प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांचे जिल्हा समन्वयक यांची काल आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सर्व बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत पीक कर्ज वाटपासंबंधाने आढावा घेण्यात आला व सर्व प्रमुख बँकांना पीक कर्जवाटपाचे लक्षांकानुसार पीक कर्जवाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच दिनांक ३0 जुन पयर्ंत सर्व बँकांनी ६0 टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शासन निर्णय दिनांक ११ जुन २0२१ नुसार डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून या अंतर्गत सन २0२१-२२ मध्ये रु. ३ लाखापयर्ंतचे पीककर्ज घेणार्‍या व सदर कर्ज विहित मुदतीत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मुद्दलाएवढे पीक कर्ज परतफेड करावे लागेल व व्याजामध्ये सवलत मिळेल. बँकांनी शेतकर्‍यांना किसान क्रेडीट कार्डमार्फतच कर्जवाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. बँक स्तरावर किती शेतकरी खातेदारांचे किसान क्रेडिट कार्ड वाटप बाकी आहे. त्याची सर्व माहिती संबंधीत बँकांनी तालुक्याचे तहसिलदार / सहाय्यक निबंधक यांना उपलब्ध करुन द्यावी, त्यामुळे शेतकर्‍यांना सुलभरित्या पीककर्ज उपलब्ध होऊ शकेल. तसेच बँकांनी त्यांचेकडील ओटीएस योजनेबाबत शेतकर्‍यांना माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन करण्यात आले. सभेला जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक अमर गजभिये, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदा या बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या